नवी दिल्ली : येत्या २९ सप्टेंबर रोजी जारी होणाऱ्या पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेकडील रेपो दरात पाव टक्का कपात होण्याची शक्यता आहे. एसबीआय रिसर्च या संस्थेने रविवारी ही माहिती दिली.
एसबीआय रिसर्चने जाहीर केलेल्या एका अहवालात म्हटले आहे की, सध्याची परिस्थिती धोरणात्मक व्याज दरात कपात करण्यास पोषण आहे. महागाईचा दर सध्या उण्यावर आहे. अनेक व्यावसायिक बँकांनी व्याज दरांत कपात केली आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक आठवडे गायब असलेला मान्सून देशाच्या अनेक भागांत सक्रिय झाला आहे. भारताच्या जवळपास ६५ टक्के भूभागावर पाऊस झाला आहे. ही सर्व अनुकूल परिस्थिती व्याज दरांत कपात करण्यास पोषक आहे. या आधी रिझर्व्ह बँकेने 0.७५ टक्के कपात केली होती.
रेपो दरात पाव टक्का कपात शक्य
येत्या २९ सप्टेंबर रोजी जारी होणाऱ्या पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेकडील रेपो दरात पाव टक्का कपात होण्याची शक्यता आहे
By admin | Published: September 20, 2015 11:07 PM2015-09-20T23:07:07+5:302015-09-20T23:07:07+5:30