पणजी : गोव्यात शुक्रवारी झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या ३७ व्या बैठकीत पर्यावरणपूरक घटकांपासून बनवण्यात आलेल्या कप आणि प्लेटस यांना करातून वगळण्यात आले आहे. आधी यावर ५ टक्के कर लागत होता. भारतात बनू शकणाऱ्या परंतु परदेशातून आयात केल्या जाणाºया संरक्षण सामग्रीला २०२४ पर्यंत जीएसटी कक्षेतून वगळण्यात आले आहे.
या बैठकीत १० ते १३ प्रवासीक्षमता असलेल्या पेट्रोलवरील वाहनांवर आकारला जाणारा काँपेन्सेशन उपकर १ टक्का इतका कमी करण्यात आला आहे तर डिझेल वाहनांवरील काँपेन्सेशन उपकर ३ टक्के इतका कमी केला आहे. याआधी दोन्ही प्रकारच्या वाहनांवर हा कर १५ टक्के इतका होता.
जीएसटी कौन्सिलने कॉफिनेटेड पेयांवरील कर २८ टक्के इतका केला आहे. आता यावर १२ अधिक भरपाई उपकरही लागणार आहे. रेल्वेला पुरवण्यात येणाºया साहित्यावरील जीएसटी ५ वरून १२ टक्के करण्यात आला आहे. हिऱ्यांच्या जॉबवर्कवरील जीएसटी ५ टक्क्यांवरून १.५ टक्के करण्यात आला असून, मशिनद्वारे करण्यात येणाºया कामांवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आला आहे. मौल्यवान रत्नांच्या पॉलिश आणि कटिंगवरील जीएसटीही कमी करण्यात आला आहे.
भारतात होणाºया १७ वर्षांखालील मुलींच्या फुटबॉल वर्ल्डकपसाठी फिफा आणि अन्य संस्थांना पुरवठा करण्यासाठी करसूट देण्यात आली आहे.
स्लाईड फास्टनरवरील जीएसटी १८ वरून १२ टक्के करण्यात आला आहे. विणलेल्या तसेच न विणलेल्या पॉलिथीन पिशव्यांवर एकसमान १२ टक्के इतका जीएसटी आकारला जाईल.
>छोट्या उद्योगांना रिटर्न फाईल करण्यात सूट
कंपोझिशन स्कीममधील करदात्यांना २०१७-१८ आणि २०१८-१९ साठी जीएसटीआर 9ए भरण्यात सूट देण्यात आली आहे. दोन कोटी रूपयांपर्यंत उलाढाल असणाºया छोट्या उद्योगांना दोन्ही वर्षांसाठी रिटर्न फाईल करणे ऐच्छिक करण्यात आले आहे.
काही वाहनांवरील कॉम्पेसेशन उपकरात घट
गोव्यात शुक्रवारी झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या ३७ व्या बैठकीत पर्यावरणपूरक घटकांपासून बनवण्यात आलेल्या कप आणि प्लेटस यांना करातून वगळण्यात आले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 05:05 AM2019-09-21T05:05:21+5:302019-09-21T05:05:55+5:30