Lokmat Money > बिझनेस न्यूज > गृहकर्जाच्या व्याजंदरात कपात

गृहकर्जाच्या व्याजंदरात कपात

स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) गृहकर्जावरील व्याजदरात 0. १५ टक्क्यांची कपात

By admin | Published: November 3, 2016 06:07 AM2016-11-03T06:07:44+5:302016-11-03T06:07:44+5:30

स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) गृहकर्जावरील व्याजदरात 0. १५ टक्क्यांची कपात

Reduction in home loan interest rates | गृहकर्जाच्या व्याजंदरात कपात

गृहकर्जाच्या व्याजंदरात कपात


नवी दिल्ली : स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) गृहकर्जावरील व्याजदरात 0. १५ टक्क्यांची कपात करून, सणासुदीच्या काळात आपल्या ग्राहकांचा आनंद द्विगुणित केला आहे. आयसीआयसीआय बँकेने आपल्या ग्राहकांना ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली आहे.
एसबीआयने केलेली 0.१५ टक्क्यांची व्याजदर कपात ७५ लाखांपर्यंतच्या गृहकर्जासाठी लागू असेल. एसबीआयचे गृहकर्ज सर्वाधिक स्वस्त आहे. नव्याने घर घेणाऱ्यांना चांगली संधी आहेच, त्याचबरोबर दुसऱ्या बँकेकडून कर्ज काढून आधीच घर घेतलेल्यांनाही हे कर्ज एसबीआयकडे हस्तांतरित करून मासिक हप्ता करण्याची संधी आहे. एसबीआयच्या गृहकर्जावर आता ९.१५ टक्के व्याजदर आकारला जाईल. महिला कर्जदारांना ९.१0 टक्केच व्याजदर असेल.
आयसीआयसीआय बँकेने पगारदारांसाठी ‘आयसीआयसीआय होम ओव्हरड्राफ्ट’ योजना आणली आहे. या योजनेत मालमत्तेवर ५ लाखांपासून १ कोटी रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट मिळू शकतो. मुदती कर्ज आणि ओव्हरड्राफ्ट अशा सवलतीचा यात संयोग करण्यात आला आहे.
आयसीआयसीआय मुदत कर्ज ग्राहकांना तत्काळ निधी उपलब्ध करून देते, तर ओव्हरड्राफ्ट लवचिकता प्रदान करते. हा पैसा ग्राहक कोणत्याही कारणासाठी खर्च करू शकतो. मंजूर कर्जापैकी १0 टक्के रक्कम मुदती कर्ज, तर ९0 टक्के रक्कम ओव्हरड्राफ्ट म्हणून दिली जाते, असे बँकेच्या वतीने सांगण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>व्याजदर कपातीचा असा होईल लाभ
एसबीआयने व्याजदरात केलेल्या 0.15 टक्के कपातीचा ग्राहकास पुढील प्रमाणे लाभ होईल.समजा, एका व्यक्तीने एसबीआयकडून 50 लाखांचे गृहकर्ज घेतले. व्याजदर0.15% कमी झाल्यामुळे त्याच्या मासिक हप्त्यात 542 रुपयांची कपात होईल.हे कर्ज ३0 वर्षे मुदतीचे आहे, असे गृहीत धरल्यास दरमहा वाचणाऱ्या ५४२ रुपयांतून ग्राहकाची एकूण २ लाख रुपयांची बचत होईल. मासिक हप्त्यातून वाचलेले ५४२ रुपये ग्राहकाने आवर्त ठेवीत गुंतविल्यास कर्ज फिटल्यानंतर त्याला ६ लाख रुपये मिळतील.

Web Title: Reduction in home loan interest rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.