मुंबई : प्राप्तिकर खात्याची नोटीस आल्यानंतर घाबरून जाण्याची गरज नाही. नोटिशीनंतरह सुधारित प्राप्तिकर परतावा भरता येणार आहे.
करदात्यांनी परतावा न भरल्यास विभागाकडून नोटीस पाठविली जाते. परताव्यामध्ये चुका असल्या, तरी नोटीस येते व प्राप्तिकर विभाग दंडाची कारवाई करते. आता नोटिशीनंतरही सुधारित परतावा भरता येईल, असे प्राप्तिकर लवादाने स्पष्ट केले आहे.
प्राप्तिकर विभागाने करदात्याचा सुधारित परतावा फेटाळला होता. प्राप्तिकर कायद्याच्या कलम १४३ (२) नुसार नोटिशीनंतर परतावा भरता येत नसल्याचे विभागाचे म्हणणे होते. त्यामुळे करदात्याने लवादाकडे धाव घेतली. कायद्यानुसार करदात्याला सुधारित परतावा भरण्याची मुभा आहे. त्यामध्ये करदाता त्याची अतिरिक्त वा कमी झालेली मिळकत घोषित करू शकतो. करात सवलतही मागणे शक्य आहे. सुधारित परतावा नोटिशीनंतरही भरता येईल.
करदात्याला सुधारित परतावा भरण्याची मर्यादा १२ महिने असेल. वित्त वर्षाच्या अखेरच्या दिवसापासून किंवा प्राप्तिकर खात्याकडून मूल्यांकन झाल्यानंतर १२ महिन्यांच्या आत हा परतावा भरावा लागेल, असे लवादाने स्पष्ट केले आहे.
आयटी नोटिशीनंतरही भरा परतावा
प्राप्तिकर खात्याची नोटीस आल्यानंतर घाबरून जाण्याची गरज नाही. नोटिशीनंतरह सुधारित प्राप्तिकर परतावा भरता येणार आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 03:43 AM2018-06-23T03:43:22+5:302018-06-23T03:43:33+5:30