Lokmat Money > बिझनेस न्यूज > राज्यात उद्योगवाढीसाठी नियमांत शिथिलता : देसाई

राज्यात उद्योगवाढीसाठी नियमांत शिथिलता : देसाई

महाराष्ट्रात गुंतवणूक वाढण्याबरोबरच नवीन उद्योगधंदे मोठ्या संख्येने यावेत, यासाठी राज्य सरकारने पूर्वीचे जाचक व वेळखाऊ नियम बदलून त्यामध्ये शिथिलता आणली

By admin | Published: January 9, 2016 12:53 AM2016-01-09T00:53:09+5:302016-01-09T00:53:09+5:30

महाराष्ट्रात गुंतवणूक वाढण्याबरोबरच नवीन उद्योगधंदे मोठ्या संख्येने यावेत, यासाठी राज्य सरकारने पूर्वीचे जाचक व वेळखाऊ नियम बदलून त्यामध्ये शिथिलता आणली

Regulation of Rule for Industry Increase: Desai | राज्यात उद्योगवाढीसाठी नियमांत शिथिलता : देसाई

राज्यात उद्योगवाढीसाठी नियमांत शिथिलता : देसाई

नाशिक : महाराष्ट्रात गुंतवणूक वाढण्याबरोबरच नवीन उद्योगधंदे मोठ्या संख्येने यावेत, यासाठी राज्य सरकारने पूर्वीचे जाचक व वेळखाऊ नियम बदलून त्यामध्ये शिथिलता आणली आहे़ यामुळे उद्योजकांना उद्योगांसाठीच्या परवानगीसाठी कमी वेळ लागणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली़ महाराष्ट्र चेंबर्स आॅफ कॉमर्सतर्फे आयोजित प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी ते नाशिकला आले होते़़
देसाई म्हणाले की, संपूर्ण राज्यात पाण्याचा प्रश्न असून, सरकार त्यादृष्टीने नियोजन करीत आहोत़ उद्योगविकासाबाबत महाराष्ट्र आघाडीवरच असल्याचे येत्या काही दिवसांत केंद्राकडून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या आकडेवारीवरून दिसेल.

Web Title: Regulation of Rule for Industry Increase: Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.