Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुजरातच्या चार गावांची रिलायन्सतर्फे पुनर्बांधणी

गुजरातच्या चार गावांची रिलायन्सतर्फे पुनर्बांधणी

गुजरातच्या बनासकांठा व पाटण या दोन पूरग्रस्त जिल्ह्यांतील चार गावे पुनर्बांधणीसाठी दत्तक घेण्याचा निर्णय रिलायन्स फाउंडेशनने घेतला आहे. रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांनी ही माहिती देताना सांगितले की, या चार गावांच्या पुनर्बांधणीसाठी आम्ही १0 कोटी रुपये खर्च करणार आहोत. त्या संदर्भात गुजरात सरकारशी चर्चा सुरू आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 12:44 AM2017-08-12T00:44:05+5:302017-08-12T00:44:17+5:30

गुजरातच्या बनासकांठा व पाटण या दोन पूरग्रस्त जिल्ह्यांतील चार गावे पुनर्बांधणीसाठी दत्तक घेण्याचा निर्णय रिलायन्स फाउंडेशनने घेतला आहे. रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांनी ही माहिती देताना सांगितले की, या चार गावांच्या पुनर्बांधणीसाठी आम्ही १0 कोटी रुपये खर्च करणार आहोत. त्या संदर्भात गुजरात सरकारशी चर्चा सुरू आहे.

 Rehabilitation of the four villages of Gujarat by Reliance | गुजरातच्या चार गावांची रिलायन्सतर्फे पुनर्बांधणी

गुजरातच्या चार गावांची रिलायन्सतर्फे पुनर्बांधणी

बनासकांठा : गुजरातच्या बनासकांठा व पाटण या दोन पूरग्रस्त जिल्ह्यांतील चार गावे पुनर्बांधणीसाठी दत्तक घेण्याचा निर्णय रिलायन्स फाउंडेशनने घेतला आहे. रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांनी ही माहिती देताना सांगितले की, या चार गावांच्या पुनर्बांधणीसाठी आम्ही १0 कोटी रुपये खर्च करणार आहोत. त्या संदर्भात गुजरात सरकारशी चर्चा सुरू आहे.
या गावांतील पूरग्रस्तांना रिलायन्स फाउंडेशनचे कार्यकर्ते मदतकार्य करीत आहेत. त्यांना जेवणाची पाकिटे, अन्नधान्य, चादरी, ब्लँकेट्स, स्वयंपाकाची भांडी, जनावरांसाठी लागणारा चारा यांचे वाटप करण्यात आले आहे. गावांना मदत व त्यांची पुनर्बांधणी यासाठी १0 स्वयंसेवी संस्थांची मदत रिलायन्स फाउंडेशनने घेतली आहे. आम्ही या गावांतील लोकांसोबत आहोत, त्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन नीता अंबानी यांनी गावकºयांना केले आहे.
रिलायन्स फाउंडेशन ही शिक्षण, आरोग्य, क्रीडा ग्रामविकास आदी क्षेत्रांत अनेक वर्षे काम करीत आहे. (वृत्तसंस्था)

Web Title:  Rehabilitation of the four villages of Gujarat by Reliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.