नवी दिल्ली - फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याचा शोध घेण्यासंबंधी ‘लूक आऊट’ परिपत्रकात बदल करीत ते सौम्य करण्यासंबंधी माहिती उघड करण्यास सीबीआयने नकार दिला आहे. पुण्याचे आरटीआय कार्यकर्ते विहार धुर्वे यांनी याबाबत माहिती मागितली असता सीबीआयने कलम ८ (१) चा संदर्भ देत सध्या तपास सुरू असल्याचे कारण दिले. फरार आरोपींच्या खटल्यावर प्रभाव पडेल किंवा तपासाच्या प्रगतीवर परिणाम होईल अशी माहिती उघड न करण्याची मुभा या कलमामुळे मिळाली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने मात्र तपासावर कसा परिणाम होईल याबाबत स्पष्टीकरण देणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले आहे.
मल्ल्याच्या ‘लूक आऊट’बाबत माहिती देण्यास नकार
फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याचा शोध घेण्यासंबंधी ‘लूक आऊट’ परिपत्रकात बदल करीत ते सौम्य करण्यासंबंधी माहिती उघड करण्यास सीबीआयने नकार दिला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 03:22 AM2018-11-09T03:22:35+5:302018-11-09T03:22:57+5:30