Lokmat Money > बिझनेस न्यूज > राेजगाराची ‘दिवाळी’; वर्षभरात १४ टक्के वाढ, मात्र, ऑगस्ट महिन्यामध्ये दिसली ७ टक्क्यांची घट

राेजगाराची ‘दिवाळी’; वर्षभरात १४ टक्के वाढ, मात्र, ऑगस्ट महिन्यामध्ये दिसली ७ टक्क्यांची घट

ऑगस्ट महिन्याअखेर संपलेल्या १२ महिन्यातील आकडेवारीनुसार राेजगार निर्मितीत १४ टक्क्यांहून अधिक वाढ झालेली आहे. मात्र, त्यास ऑगस्टमध्ये ब्रेक लागला. नाेकऱ्यांचे प्रमाण ७.१ टक्क्यांनी घटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 08:25 AM2022-10-26T08:25:22+5:302022-10-26T08:30:46+5:30

ऑगस्ट महिन्याअखेर संपलेल्या १२ महिन्यातील आकडेवारीनुसार राेजगार निर्मितीत १४ टक्क्यांहून अधिक वाढ झालेली आहे. मात्र, त्यास ऑगस्टमध्ये ब्रेक लागला. नाेकऱ्यांचे प्रमाण ७.१ टक्क्यांनी घटले आहे.

Rejgara's 'Diwali'; A year-on-year growth of 14 per cent, however, witnessed a decline of 7 per cent in the month of August | राेजगाराची ‘दिवाळी’; वर्षभरात १४ टक्के वाढ, मात्र, ऑगस्ट महिन्यामध्ये दिसली ७ टक्क्यांची घट

राेजगाराची ‘दिवाळी’; वर्षभरात १४ टक्के वाढ, मात्र, ऑगस्ट महिन्यामध्ये दिसली ७ टक्क्यांची घट

नवी दिल्ली : काेराेना महामारीने रोजगार हिरावलेल्या आणि नव्या शक्यता कमी झाल्याने हाताला काम मिळत नसलेल्या लोकांची संख्या आता घटू लागल्याचे सुखदायी चित्र समोरा आले आहे. गेल्या वर्षभरात  राेजगार निर्मितीमध्ये सुधारणा दिसून आली आहे. 

ऑगस्ट महिन्याअखेर संपलेल्या १२ महिन्यातील आकडेवारीनुसार राेजगार निर्मितीत १४ टक्क्यांहून अधिक वाढ झालेली आहे. मात्र, त्यास ऑगस्टमध्ये ब्रेक लागला. नाेकऱ्यांचे प्रमाण ७.१ टक्क्यांनी घटले आहे.

कर्मचारी भविष्य विमा संघटनेच्या इंटरनेटवरील नव्या सदस्यांच्या आकडेवारीतून राेजगार निर्मितीचे चित्र समाेर आले आहे. एप्रिलमध्ये १५ लाख नवे सदस्य जाेडले गेले हाेते. जुलैमध्ये हा आकडा १८.२ लाख एवढा हाेता. मात्र, ऑगस्टमध्ये ताे घटून १६.९ लाखांवर आला. 

इएसआयसीचेही नवे सदस्य वाढले
- कर्मचारी राज्य विमा संघटनेतील आकडेवारीतूनही साधारणत: सारखेच चित्र दिसून आले. नव्या सभासदांच्या नाेंदणीत ऑगस्टमध्ये ८% घट झाली आहे. 
- ‘ईएसआयसी’ची एप्रिलमध्ये १२.८ लाख एवढी नव्या सदस्यांची नाेंदणी झाली हाेती. जुलैमध्ये त्यात माेठी वाढ हाेऊन १५.८ लाख नवे सदस्य जाेडले गेले हाेते. तर ऑगस्टमध्ये हा आकडा घटून १४.६ लाख एवढा हाेता. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १० टक्के वाढ झाली आहे.

कोरोनाचा फटका कमी झाल्याचे चित्र
गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये १४.८ लाख नवे सदस्य ईपीएफओने जाेडले हाेते. यावेळी हा आकडा १४.४ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या वर्षी काेराेनाच्या दुसऱ्या लाटेचा तीव्र फटका राेजगार निर्मितीला फटका बसला हाेता.

Web Title: Rejgara's 'Diwali'; A year-on-year growth of 14 per cent, however, witnessed a decline of 7 per cent in the month of August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.