Lokmat Money > बिझनेस न्यूज > रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केले १२ आलिशान अपार्टमेंट, ₹१५६ कोटींची आहे डील

रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केले १२ आलिशान अपार्टमेंट, ₹१५६ कोटींची आहे डील

Rekha jhunjhunwala property: शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 08:41 PM2024-03-23T20:41:26+5:302024-03-23T20:42:55+5:30

Rekha jhunjhunwala property: शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहेत.

Rekha Jhunjhunwala buys 12 luxury apartments deal worth 156 crore rupees stamp duty worth rs 9 crores mumbai walukeshwar | रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केले १२ आलिशान अपार्टमेंट, ₹१५६ कोटींची आहे डील

रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केले १२ आलिशान अपार्टमेंट, ₹१५६ कोटींची आहे डील

Rekha jhunjhunwala property: शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला (Rekha jhunjhunwala) रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहेत. त्यांनी आपल्या कुटुंबासह दक्षिण मुंबईतील मलबार हिल येथील वाळकेश्वर रोडवर १२ आलिशान अपार्टमेंट्स खरेदी केले आहेत. ही डील १५६ कोटी रुपयांना झाली आहे. ही अपार्टमेंट एक जुनी इमारत आहे, जी रेखा झुनझुनवाला यांच्या १४ मजली रेअर व्हिला नजीक आहे.
 

रेखा झुनझुनवाला यांच्या कुटुंबीयांनी जवळपास ५० वर्ष जुन्या गृहनिर्माण संस्थेच्या संभाव्य पुनर्विकासाच्या चर्चांदरम्यान गेल्या काही महिन्यांत रॉकसाइड अपार्टमेंट्स या इमारतीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. हे कुटुंबीयांसाठी एका गुंतवणूकीप्रमाणे वाटत आहे किंवा पुनर्विकासामुळे त्यांच्या सी-फेसिंग व्ह्यूमध्ये अडथळे येऊ नये याची खात्री करण्याचा प्रयत्न आहे, असं इकॉनॉमिक टाईम्सनं एका ब्रोकरच्या हवाल्यानं म्हटलंय.
 

९.०२ कोटींची स्टॅम्प ड्युटी
 

ईटीच्या रिपोर्टनुसार, अपार्टमेंटचं सरासरी क्षेत्रफळ २१०० चौरस फूट आहे आणि एकूण क्षेत्रफळ २६,११९ चौरस फूट आहे. या कुटुंबानं गेल्या २-३ महिन्यांत केवळ व्यवहारांची रजिस्ट्रेशनसाटी ९.०२ कोटी रुपयांहून अधिक स्टँप ड्युटी भरली आहे. शेवटचा करार १५ मार्च रोजी झाला होता. त्याअंतर्गत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील १,६६६ चौरस फुटांच्या अपार्टमेंटसाठी रजिस्ट्रेशन करण्यात आलं. 

Web Title: Rekha Jhunjhunwala buys 12 luxury apartments deal worth 156 crore rupees stamp duty worth rs 9 crores mumbai walukeshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.