Lokmat Money > बिझनेस न्यूज > Rekha Jhunjhunwala Portfolio: वर्षभरात २८६% रिटर्न, चार दिवसांपासून 'या' शेअरमध्ये मोठी तेजी; तुमच्याकडे आहे का?

Rekha Jhunjhunwala Portfolio: वर्षभरात २८६% रिटर्न, चार दिवसांपासून 'या' शेअरमध्ये मोठी तेजी; तुमच्याकडे आहे का?

Rekha Jhunjhunwala Portfolio: ज्येष्ठ गुंतवणूकदार रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमध्ये असलेल्या या शेअरनं वर्षभरात गुंतवणूकदारांच्या पैशात तीन पटीनं वाढ केली. चार दिवसांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १५ टक्क्यांहून अधिक वाढ झालीये.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 12:57 PM2024-10-15T12:57:17+5:302024-10-15T13:04:19+5:30

Rekha Jhunjhunwala Portfolio: ज्येष्ठ गुंतवणूकदार रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमध्ये असलेल्या या शेअरनं वर्षभरात गुंतवणूकदारांच्या पैशात तीन पटीनं वाढ केली. चार दिवसांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १५ टक्क्यांहून अधिक वाढ झालीये.

Rekha Jhunjhunwala Portfolio 286 percent returns in a year VA Tech Wabag share has been bullish for four days do you have | Rekha Jhunjhunwala Portfolio: वर्षभरात २८६% रिटर्न, चार दिवसांपासून 'या' शेअरमध्ये मोठी तेजी; तुमच्याकडे आहे का?

Rekha Jhunjhunwala Portfolio: वर्षभरात २८६% रिटर्न, चार दिवसांपासून 'या' शेअरमध्ये मोठी तेजी; तुमच्याकडे आहे का?

Rekha Jhunjhunwala Portfolio: ज्येष्ठ गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या VA Tech Wabag या शेअरनं वर्षभरात गुंतवणूकदारांच्या पैशात तीन पटीनं वाढ केली. सलग चार दिवसांपासून त्यात वाढ होत असून या चार दिवसांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १५ टक्क्यांहून अधिक वाढ झालीये. सोमवारी, १४ ऑक्टोबर रोजी दिवसभरात त्यानं नवा उच्चांक गाठला. शेअर्समधील तेजीचा फायदा घेत काही गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुकींग केल्यानं भाव घसरले. मात्र, दिवसअखेर बीएसईवर तो ६.७८ टक्क्यांच्या शानदार वाढीसह १६७०.४५ रुपयांवर बंद झाला. दिवसभरात शेअर ८.२८ टक्क्यांनी वधारून १६९४.०० रुपयांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला (VA Tech Wabag Share Price). गेल्या वर्षी १३ ऑक्टोबर २०२३ रोजी हा भाव ४३८.४५ रुपये होता, म्हणजेच वर्षभरात त्यात २८६.३६ टक्के वाढ झाली आहे.

झुनझुनवालांकडे किती शेअर्स?

जून २०२४ तिमाहीतील कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार रेखा झुनझुनवाला यांच्याकडे ५० लाख शेअर्स आहेत. हे कंपनीच्या ८.०४ टक्के शेअर्स इतकं आहे आहे. सध्याच्या किमतीनुसार त्यांच्या होल्डिंगची किंमत ८३५.२३ कोटी रुपये आहे.

अन्य भागधारकांमध्ये मोतीलाल ओसवाल स्मॉलकॅप फंड आणि एसबीआय लाँग टर्म इक्विटी फंडसह आठ म्युच्युअल फंडांचा ३.९५ टक्के हिस्सा, विदेशी गुंतवणूकदारांची ११.५२ टक्के, दोन लाख रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक असलेल्या छोट्या गुंतवणूकदारांची ३२.४३ टक्के आणि दोन लाख रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक असलेल्यांची १८.८५ टक्के भागीदारी आहे.

कंपनीबाबत माहिती

वॉटर ट्रीटमेंटच्या बाबतीत VA Tech Wabag ही जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. त्याचा व्यवसाय केवळ भारतातच नव्हे तर मध्य पूर्व, उत्तर आफ्रिका, मध्य व पूर्व युरोप, चीन आणि आशियातही पसरलेला आहे. कंपनीनं ११,००० कोटी रुपयांची ऑर्डर बुक ठेवली आहे, त्यापैकी ५५ टक्के इंजिनीअरिंग, प्रोक्योरमेंट अँड कन्स्ट्रक्शन (ईपीसी) आणि ४५ टक्के ऑपरेशन्स अँड मेंटेनन्समधून आहे. जून तिमाहीच्या निकालानंतर कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार क्लिन वॉटरची मागणी वाढत असल्यानं लवकरच आणखी ऑर्डर मिळू शकतात आणि त्याशिवाय वॉटर इन्फ्राची मागणीही वाढत आहे. सरकारच्या 'जल जीवन मिशन'कडूनही कंपनी व्यवस्थापनाला चांगले सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Rekha Jhunjhunwala Portfolio 286 percent returns in a year VA Tech Wabag share has been bullish for four days do you have

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.