Lokmat Money > बिझनेस न्यूज > रेखा झुनझुनवाला सूसाट... Tata 'या' च्या दोन शेअर्समुळे अवघ्या 15 मिनिटांत कमावले 400 कोटी

रेखा झुनझुनवाला सूसाट... Tata 'या' च्या दोन शेअर्समुळे अवघ्या 15 मिनिटांत कमावले 400 कोटी

Rekha Jhunjhunwala Portfolio: राकेश झुनझुनवाला यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांना टाटाच्या शेअरने मालामाल केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 04:14 PM2023-04-10T16:14:24+5:302023-04-10T16:15:14+5:30

Rekha Jhunjhunwala Portfolio: राकेश झुनझुनवाला यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांना टाटाच्या शेअरने मालामाल केले.

Rekha Jhunjhunwala Portfolio: Rekha Jhunjhunwala gain 400 cr from Tata's two shares in just 15 minutes | रेखा झुनझुनवाला सूसाट... Tata 'या' च्या दोन शेअर्समुळे अवघ्या 15 मिनिटांत कमावले 400 कोटी

रेखा झुनझुनवाला सूसाट... Tata 'या' च्या दोन शेअर्समुळे अवघ्या 15 मिनिटांत कमावले 400 कोटी

Rekha Jhunjhunwala Portfolio : आज शेअर मार्केट सुरू होताच टाटा ग्रुप (Tata Group) ची कंपनी टायटन(Titan) आणि टाटा मोटर्स (Tata Motors) चे शेअर सूसाट सुटले...टायटन कंपनीच्या शेअरमध्ये (Titan Share Price) पहिल्या 15 मिनिटांत 50 रुपयांची वाढ झाल, तर टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये (Tata Motors Share) 15 मिनिटांत 32.75 रुपये वाढले. या वाढीसह दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची पत्नी रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांना 15 मिनिटांत 400 कोटी रुपयांचा फायदा झाला. रेखा यांच्याकडे टायटनचे 4,58,95,970 आणि टाटा मोटर्सचे 5,22,56,000 शेअर आहेत.

दिवसाच्या सुरुवातीला या दोन स्टॉक्समध्ये आलेली वाढ इंट्राडेमध्येही काम राहिली. अखेरच्या अपडेटनुसार, टायटन कंपनीचा शेअर 2578 रुपयांवर (Titan Share Price Today) बंद झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात म्हणजेच शुक्रवारी कंपनीचा शेअर एनएसईवर 2,548.45 रुपयांवर बंद झाला होता. आज या शेअरने 2,568 रुपयांवरुन व्यवहार सुरू केला आणि 2,602 रुपयापर्यंत पोहोचला होता. टायटनचा मार्केट कॅप 2.29 लाख कोटी आहे.

टाटा मोटर्सच्या शेअरमध्येही आज तेजी पाहायला मिळाली. नॅशनल स्‍टॉक एक्‍सचेंजवर गेल्या ट्रेडिंग सत्रात हा शेअर 437.65 रुपयांवर बंद झाला होता. आज या शेअरने 452.05 रुपयांनी सुरुवात केली आणि इंट्राडेमध्ये 473 रुपयांपर्यंत पोहोचला होता. अखेरच्या अपडेटनुसार, हा शेअर 460.90 रुपयांवर (Tata Motors Share Price) बंद झाला.

टायटनमुळे 230 कोटींचा फायदा
टायटनच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे 4,58,95,970 शेअर किंवा 5.17 टक्के हिस्‍सेदारी होती. आज दिवसाच्या सुरुवातीला अवघ्या 15 मिनिटात शेअरची किंमत 50.25 रुपयांनी वाढली आणि यामुळे रेखा यांना 230 कोटींचा( ₹50.25 x 4,58,95,970) फायदा झाला. 

टाटा मोटर्समुळे 170 कोटींचा फायदा
आज म्हणजेच सोमवारी ट्रेंडिंग सुरू झाल्याच्या 15 मिनिटांत टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये 32.75 रुपयांची वाढ झाली. Q3 FY2023 च्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टाटा मोटर्समध्ये 1.57 टक्के हिस्सा आहे आणि त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये कंपनीचे एकूण 5,22,56,000 शेअर्स आहेत. अशा प्रकारे, आजच्या तेजीमुळे रेखा यांना रु. 170 कोटी (₹ 32.75 x 5,22,56,000) चा नफा झाला.

Web Title: Rekha Jhunjhunwala Portfolio: Rekha Jhunjhunwala gain 400 cr from Tata's two shares in just 15 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.