Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोचिंग क्लास आणि जीएसटीचा संबंध

कोचिंग क्लास आणि जीएसटीचा संबंध

- अजित जोशी, चार्टर्ड अकाउंटंट प्रश्न : मी एक छोटा व्यावसायिक असून माझा कोचिंग क्लास आहे. सध्या जीएसटी खाते एक ...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 09:00 AM2023-05-22T09:00:12+5:302023-05-22T09:00:26+5:30

- अजित जोशी, चार्टर्ड अकाउंटंट प्रश्न : मी एक छोटा व्यावसायिक असून माझा कोचिंग क्लास आहे. सध्या जीएसटी खाते एक ...

Relationship of Coaching Class and GST | कोचिंग क्लास आणि जीएसटीचा संबंध

कोचिंग क्लास आणि जीएसटीचा संबंध

- अजित जोशी, चार्टर्ड अकाउंटंट

प्रश्न : मी एक छोटा व्यावसायिक असून माझा कोचिंग क्लास आहे. सध्या जीएसटी खाते एक मोहीम हातात घेणार असल्याचे मी ऐकले, त्यामध्ये मी काय काळजी घेऊ? 
उत्तर : होय, जीएसटी खात्याने असे घोषित केलेले आहे की वाढती बनावट नोंदणी आणि त्यातून होणारे काळ्या पैशांचे व्यवहार थांबवायला जीएसटी नोंदणी घेतलेल्या करदात्यांकडे ते प्रत्यक्ष भेट देणार आहेत. याकरता पुढील गोष्टीची काळजी घ्या

 तुमची नोंदणी झालेली असेल त्या ठिकाणाहूनच तुमचा व्यवसाय चालतो आहे ना, ते पहा. तिथे जीएसटी क्रमांकाची पाटी स्पष्टपणे लावा.
 आपल्या कार्यालयात नोंदणीचे प्रमाणपत्र स्पष्ट लावा.
 जागा ज्यांच्या मालकीची आहे, त्यांचे नाहरकत पत्र आणि मालकी सिद्ध करणारे वीज बिल तयार ठेवा.
 खरेदी, विक्री, उत्पन्न वगैरेचे हिशेब, बँक अकाउंट स्टेटमेंट, खाते पुस्तिका अगर संगणकावर असलेले हिशेब, असे सगळे महत्त्वाचे व्यवहाराचे तपशील आणि कागदपत्र मुख्य व्यवहाराच्या ठिकाणी उपलब्ध ठेवा.

प्रश्न : मी घरासाठी घेतलेल्या कर्जावर अंदाजे रूपये ३ लाख ५६ हजार व्याज या वर्षात भरणार आहे. त्याचा करावर काय परिणाम होईल? 

उत्तर : यात दोन शक्यता आहेत. घरभाडे मिळते आहे का? मग त्यातून तुम्ही (कर कायद्यातल्या इतर गोष्टी झाल्यावर) संपूर्ण व्याज वजा करू शकता. त्यामुळे समजा नुकसान किंवा उणे उत्पन्न २ लाख ३५ हजार रूपये आले, तर तेही तुम्ही इतर उत्पन्नातून वजा करू शकता. पण त्यावर २ लाख रूपये मर्यादा आहे. उरलेले ३५ हजार रूपये पुढच्या वर्षीच्या घरातून येणाऱ्या उत्पन्नातून वजा करता येतील.

 याउलट तुम्ही जर घर स्वतः राहायला वापरत असाल, तर तुम्ही भरत असल्यापैकी जास्तीत जास्त २ लाख रूपये व्याज वजा करता येईल. 

 त्यामुळे तुमचे घरातून उणे उत्पन्न २ लाख रूपयेच येईल. मग ते इतर उत्पन्नातून वजा करता येईल. मात्र उरलेल्या १ लाख ५६ हजार रुपयांचा करात फायदा होणार नाही. थोडक्यात स्वतः राहात असलेल्या घराच्या कर्जावर देत असलेल्या व्याजाचा फायदा करांसाठी तुलनेत कमी होतो.

Web Title: Relationship of Coaching Class and GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GSTजीएसटी