Join us  

Reliance 47th AGM : रिलायन्सच्या गुंतवणूकदारांना 'अच्छे दिन', बोनस शेअर्स मिळणार? अंबानींची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 2:29 PM

Reliance 47th AGM : मुकेश अंबानी यांच्या देशातील सर्वात मौल्यवान असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रिजची ४७ वी सर्वसाधारण सभा गुरुवारी पार पडली. या सभेदरम्यान अंबानी काय घोषणा करणार याकडेही सर्वांचं लक्ष लागून होतं. एजीएमदरम्यान मुकेश अंबानी यांनी गुंतवणूकदारांना सुखावणारी घोषणा केली.

Reliance 47th AGM : मुकेश अंबानी यांच्या देशातील सर्वात मौल्यवान असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रिजची ४७ वी सर्वसाधारण सभा (47th Annual General Meeting) गुरुवारी पार पडली. या सर्वसाधारण सभेपूर्वीच रिलायन्सच्या शेअरमध्ये (RIL Share) तेजी दिसून आली होती. या सभेदरम्यान अंबानी काय घोषणा करणार याकडेही सर्वांचं लक्ष लागून होतं. एजीएमदरम्यान मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी गुंतवणूकदारांना सुखावणारी घोषणा केली. रिलायन्सच्या गुंतवणूकदारांना एकावर एक बोनस शेअर देण्यावर विचार करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

यावेळी मुकेश अंबानी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेवरही भाष्य केलं. "भारत तेजीनं प्रगती करत आहे. आयएमएफच्या अंदाजानुसार २०२७ पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. भारताची अर्थव्यवस्था जर्मनी आणि जपान यांनाही मागे टाकेल," असं अंबानी म्हणाले.

बोनस शेअरची घोषणा

मुकेश अंबानी यांनी एजीएमदरम्यान आपल्या गुंतवणूकदारांना एकावर एक बोनस शेअर जारी करण्यावर विचार करणार असल्याची घोषणा केली. याचाच अर्थ रिलायन्सच्या एका शेअरवर गुंतवणूकदारांना १ शेअर देण्यात येऊ शकतो. एजीएमच्या (Reliance AGM 2024) दिवशी दुपारी १.४५ वाजता यावर निर्णय घेण्यात आलाय आणि यासाठी ५ सप्टेंबर रोजी संचालक मंडळाची बैठक पार पडेल. व्यवसायाचा विस्तार आणि मजबूत फायनान्शिअल परफॉर्मन्स पाहता कंपनीनं ही घोषणा केली असल्याचं त्यांनी नमूद केलं.

आम्ही वेल्थ क्रिएट करत आहोत. हाइएस्ट क्वालिटी प्रोडक्ट आणि सेवा उपलब्ध करून देत आहोत. कंपनीचे शेअरहोल्डर्स हे कंपनीचा कणा आहेत. आम्ही शॉर्ट टर्म प्रॉफिटच्या व्यवसायात नाही, असंही अंबानींनी स्पष्ट केलं.

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानी