Reliance AGM 2023: रिलायन्सची ४६ वी एजीएम आज पार पडली. यादरम्यान, रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस आता इन्शुरन्स क्षेत्रात एन्ट्री घेणार असल्याची घोषणा अंबानी यांनी केली.
मुकेश अंबानी यांनी आपल्या शेअरधारकांसमोर जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचा रोडमॅप सादर केला. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस आता इन्शुरन्स क्षेत्रात प्रवेश घेणार आहे. यासाठी ग्लोबल लीडर्ससोबत भागीदारी केली जाणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसद्वारे १४२ कोटी भारतीयांना आर्थिक सेवा पुरवल्या जातील. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस ब्लॉकचेन आणि सीबीडीटी आधारित प्रोडक्ट लाँच करेल. यात लाईफ आणि हेल्थ इन्शुरन्सचाही समावेश असेल असं अंबानी म्हणाले.
जामनगरमध्ये बॅटरी गीगाफॅक्ट्रीरिलायन्स समूह २०२६ पर्यंत बॅटरी गीगाफॅक्ट्री स्थापन करणार आहे. ही फॅसिलिटी गुजरातच्या जामनगर येथे उभारली जाणार असल्याचं अंबानी यांनी नमूद केलं.
२०३५ पर्यंत नेट कार्बन झिरोचं ध्येय समोर ठेवून प्रवास सुरू आहे. यासाठी ग्रीन एनर्जीचा तेजीनं विकास केला जात आहे. कार्बन फायबरमध्ये जगातील पहिल्या तीन कंपन्यांमध्ये येण्याचं आमचं लक्ष्य आहे. आम्ही फॉसिल फ्युअलपासून ग्रीन एनर्जीच्या दिशेनं जात आहोत. पुढील काही वर्ष आमच्यासाठी बदलांची असतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.