Join us

भारतात Ai सॉल्यूशन्सवर काम करणार Jio; रिलायन्स एजीएममध्ये मुकेश अंबानींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 4:11 PM

'रिलायन्स रिटेलचा जगातील टॉप 100 कंपन्यांमध्ये समावेश.'

Reliance AGM 2023: देशातील सर्वात मोठ्या उद्योग समूहापैकी एक असलेल्या रिलायन्स (Reliance) इंडस्ट्रीजची 46 वी एजीएम (Reliance AGM 2023) आज पार पडली. दरवर्षी रिलायन्सच्या एजीएमची खूप चर्चा होते. यावेळी रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. जगभरात Ai क्रांती होत आहे. Jio Platforms ला भारतात Ai ची पायनियरिंग करायची आहे, अशी माहिती मुकेश अंबानी यांनी दिली.

मुकेश अंबानी पुढे म्हणाले, भारताकडे मोठ्या प्रमाणात डेटा, टॅलेंट आणि स्केल आहे. सध्या आम्हाला Ai- रेडी डिजिटल पायाभूत सुविधांची गरज आहे. यातून Ai ची वाढती मागणी हाताळली जाऊ शकेल. आम्हाला 2000 मेगावॅट Ai-रेडी संगणकीय क्षमता विकसित करायची आहे. आम्ही भारतीयांना, सरकारला आणि व्यवसायांना भारत केंद्रित Ai मॉडेल आणि Ai समर्थित उपाय देऊ इच्छितो, असंही ते यावेळी म्हणाले.

यावेळी मुकेश अंबानी यांनी समूहातील रिटेल कंपनी रिलायन्स रिटेलच्या यशाचे कौतुक केले. ते म्हणाले की, रिलायन्स रिटेल (Reliance Retail) ही एकमेव भारतीय रिटेल कंपनी आहे, जिचा जगातील टॉप 100 कंपन्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. जर रिलायन्स रिटेल भारतीय स्टॉक एक्स्चेंजवर सूचिबद्ध झाली असती, तर रिलायन्स रिटेल ही मार्केट कॅपिटलायझेशनच्या दृष्टीने देशातील चौथी सर्वात मोठी कंपनी ठरली असती.

अंबानी पुढे म्हणाले की, 2022-23 मध्ये रिलायन्स रिटेलचा महसूल 2,60,364 लाख कोटी रुपये राहिला आहे, तर कंपनीने 9181 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. कतार गुंतवणूक प्राधिकरणाने (QIA) गेल्या आठवड्यात रिलायन्स रिटेलमधील एक टक्का हिस्सा खरेदी केल्याचा संदर्भ देत मुकेश अंबानी म्हणाले की, या गुंतवणुकीनंतर रिलायन्स रिटेलचे मूल्यांकन 4.28 लाख कोटी रुपयांवरुन 8.278 लाख कोटी रुपये झाले आहे. 

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानीव्यवसायगुंतवणूकपैसा