Join us  

दिवाळीला लॉन्च होणार Jio Ai Cloud, युजरला मिळणार मोफत 100 GB स्टोरेज...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 4:02 PM

Reliance AGM 2024 : मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत Jio बाबत मोठ्या घोषणा केल्या आहेत.

Reliance AGM 2024 : मुकेश अंबानी यांच्या देशातील सर्वात मौल्यवान रिलायन्स समूहाची 47 वी सर्वसाधारण सभा (Reliance AGM 2024) गुरुवारी(दि.29) पार पडली. यावेळी अंबानी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. मुकेश अंबानी यांनी 2G मुक्त भारताचा नारा दिला. याशिवाय, Jio संदर्भातही मोठ्या घोषणा केल्या आहेत. तसेच, कंपनी लवकरच आपली क्लाउड सेवा सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

2016 मध्ये रिलायन्स Jio सुरू झाल्यापासून मुकेश अंबानी यांनी आपल्या प्रत्येक AGM मध्ये जिओ संदर्भात मोठ मोठ्या घोषणा केल्या आहेत. आता त्यांनी आपली Jio Ai-Cloud सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. येत्या दिवाळीपासून ही सेवा सुरू होणार असून, कंपनी आपल्या ग्राहकांना Jio AI-Cloud वेलकम ऑफर अंतर्गत 100 GB मोफत डेटा स्टोरेज देणार आहे. 

फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स सुरक्षित ठेवाकंपनीचे म्हणणे आहे की, Jio च्या ग्राहकांसाठी Jio Ai-Cloud सेवा उपलब्ध असेल. या क्लाउड स्टोरेजमध्ये युजरला त्यांचे फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्ससह इथर डिजिटल कंटेट सुरक्षित ठेवता येईल. यंदाच्या दिवाळीपासून ही सेवा सुरू होणार आहे. जिओने गेल्या एका वर्षात 5G आणि 6G तंत्रज्ञानासाठी 350 पेटंट दाखल केले आहेत. यासोबतच कंपनीने आपल्या Jio Fibers ची संख्या 100 दिवसांत वेगाने वाढवण्याची घोषणा केली आहे.

प्रत्येकाकडे AI-तंत्रज्ञान असेलएजीएममध्ये मुकेश अंबानी यांनी म्हटले की, एआय तंत्रज्ञान आगामी काळात सर्वात मोठा बदल घडवून आणेल. प्रत्येक भारतीयाला एआयशी जोडणे, हे आमचे ध्येय आहे. लोकांना Ai शी जोडण्याचे वचन आम्ही पूर्ण करू, त्यासाठी Jio Brain च्या नावाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणले जाणार असून, गुजरातमधील जामनगर येथे Ai डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. 'जिओ ट्रू 5Gने जगातील सर्वात जलद 5G स्वीकारण्याचा विक्रमही केला आहे. हे जगातील सर्वात प्रगत 5G नेटवर्कपैकी एक बनले आहे.

Jio फोन कॉल्सवरही Ai सुविधा उपलब्ध असेलयावेळी बोलताना आकाश अंबानी म्हणाले की, Jio युजरला फोन कॉल्समध्ये Ai आधारित सेवा मिळेल. कंपनीने याचे नाव Jio Phonecall Ai ठेवले आहे. या सेवेमध्ये तुम्ही प्रत्येक फोन कॉलमध्ये Ai तंत्रज्ञान वापरण्यास सक्षम असाल. यामध्ये तुम्ही Jio Cloud वर फोन कॉल रेकॉर्ड करू शकाल. Jio Cloud वर रेकॉर्ड केलेले कॉल आपोआप टेक्स्टमध्ये रुपांतरित होतील. इतकेच नाही, तर तुमच्या कॉल संभाषणाचा सारांश यात येईल. तुमचा कॉल दुसऱ्या भाषेत अनुवादित करता येईल.

टॅग्स :जिओरिलायन्समुकेश अंबानीआकाश अंबानीव्यवसाय