उद्योगपती मुकेश अंबानी आता मीडिया, मनोरंजन क्षेत्रात मोठं पाऊल टाकणार आहे. रिलायन्सने यासाठी मोठी तयारी केली आहे. कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज वॉल्ट डिस्नेसोबत नॉन-बाइंडिंग करार केला आहे. गेल्या आठवड्यात लंडनमध्ये दोन्ही कंपन्यांमध्ये हा करार झाला होता. दोन्ही कंपन्यांची योजना देशातील सर्वात मोठा मीडिया आणि मनोरंजन व्यवसाय निर्माण करण्याची आहे. हे विलीनीकरण स्टॉक आणि कॅशमध्ये असेल आणि रिलायन्सकडे ५१ टक्के आणि डिस्नेची ४९ टक्के हिस्सेदारी असेल. हा करार फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मात्र, रिलायन्सला जानेवारीअखेर ते पूर्ण करायचे आहे.
स्वस्तात घर बांधण्याची हीच योग्य वेळ; महाराष्ट्रात लोखंडी सळ्या ३००० नी स्वस्त झाल्या
लंडनमध्ये झालेल्या बैठकीत केविन मेयर आणि मुकेश अंबानी यांचे निकटवर्तीय मनोज मोदी उपस्थित होते. मेयरने डिस्नेमध्ये काम केले आणि जुलैमध्ये कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब इग्नर यांनी त्यांना सल्लागार म्हणून परत आणले. तज्ज्ञांच्या मते, करार झाल्यानंतर उर्वरित प्रक्रियेवर काम सुरू होईल. यामध्ये मूल्यांकनाचाही समावेश आहे. १२ डिसेंबर रोजी प्रस्तावित डीलबद्दल प्रथम माहिती दिली. विलीनीकरण करारामध्ये स्टार इंडिया आणि वायकॉम18 च्या संपूर्ण ऑपरेशन्सचा समावेश आहे.
स्टार इंडियाचे भारतात ७७ चॅनेल्स आहेत आणि वायाकॉम 18 चे ३८ चॅनल आहेत. एकूण दोन्हीकडे ११५ चॅनेल आहेत. यामध्ये Disney Plus Hotstar आणि Jio Cinema या दोन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचाही समावेश आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये डिस्ने स्टारचा निव्वळ नफा १,२७२ कोटी रुपये होता तर डिस्ने प्लस हॉटस्टारला ७४८ कोटी रुपयांचा तोटा झाला. Viacom 18 चा निव्वळ नफा ११ कोटी रुपये होता. या करारामध्ये ४५ ते ६० दिवसांचा विशेष कालावधी असू शकतो जो परस्पर संमतीने वाढविला जाऊ शकतो. या करारासाठी दोन कंपन्यांमध्ये अनेक महिन्यांपासून बोलणी सुरू होती.
डिस्ने इंडियाच्या प्रवक्त्याने यावर भाष्य करण्यास नकार दिला. रिलायन्सनेही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. रिलायन्सची सहयोगी कंपनी Viacom18 ची स्टेप डाउन उपकंपनी तयार करण्याची योजना आहे. स्टॉक स्वॅपद्वारे ते स्टार इंडियामध्ये विलीन केले जाईल. विलीनीकरणानंतर, स्थापन झालेल्या कंपनीमध्ये रिलायन्सकडे ५१ टक्के आणि डिस्नेची ४९ टक्के भागीदारी असेल. दरम्यान, झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस आणि सोनी ग्रुपची स्थानिक कंपनी यांच्यातील १० अब्ज डॉलरचा विलीनीकरणाचा करार बाकी आहे. याची घोषणा दोन वर्षांपूर्वी करण्यात आली होती.