नवी दिल्लीः रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 43व्या एजीएम (RIL 43rd AGM 2020)ला सुरुवात झाली असून, मुकेश अंबानींनी मोठी घोषणा केली आहे. मुकेश अंबानींकडूनजिओ 5G रोडमॅपचे अनावरण करण्यात आलं असून, ही सुविधा 2021मध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे इतर देशांमध्येसुद्धा ही सेवा सुरू करणार असल्याचं मुकेश अंबानींनी जाहीर केलं आहे. भारताला विकसित बनवण्यासाठी ही सुविधा जागतिक स्तरावर पोहोचवण्याची हीच वेळ असल्याचंही अंबानींनी सांगितलं आहे.
जिओने अगदी मुळापासून संपूर्ण 5G सोल्यूशन डिझाइन केले आणि विकसित केले आहे. स्पेक्ट्रम उपलब्ध झाल्यावर मेड इन इंडिया टेक्नॉलॉजी एका वर्षात उपयोजित आणि लाँच केली जाऊ शकते. जिओ आपले 4 जी नेटवर्क सहजपणे 5G श्रेणीवर मिळणार आहे, कारण ते सर्व आयपी नेटवर्क आर्किटेक्चर आहे. जिओ प्लॅटफॉर्म 'आत्मनिर्भर भारत'साठीचे महत्त्वाचे उदाहरण ठरेल, असंही अंबानी म्हणाले आहेत. बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सची किंमत जवळपास दीड टक्क्यांनी वाढून 2000 रुपयांवर गेली होती. यापूर्वी मंगळवारी हे शेअर्स 1917 रुपयांवर बंद झाले होते. 23 मार्च रोजी 867 रुपयांच्या नीचांक असलेले शेअर्स तुलनेत 125 टक्क्यांनी वाढले आहेत. ही भरभराट 4 महिन्यांहून अधिक काळात झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी बुधवारी कंपनीच्या 43 व्या सर्वसाधारण सभेत रिलायन्स जिओ आणि गुगलच्या भागिदारीची घोषणा केली. गुगलकडून 7.7 टक्के भागिदारीसाठी रिलायन्स जिओमध्ये 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले. यापूर्वी फेसबुकने जिओसोबत 9.99 टक्क्यांची भागिदारी म्हणून 44 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मुकेश अंबानी यांनी आत्तापर्यंत जिओची भागिदारी विकून तब्बल 1.18 लाख कोटी रुपये कमावले आहेत.
काळाआधी कर्जमुक्तीचं आश्वासन- कोरोनाच्या संकटकाळातही गुंतवणूकदारांच्या वतीने त्याच्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे प्रचंड गुंतवणूक आणण्यात कंपनी यशस्वी ठरली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या डिजिटल जिओ प्लॅटफॉर्मवर २२ एप्रिल ते १२ जुलै या कालावधीत एकूण 25.24 टक्क्यांच्या विक्रीतून कंपनीला 1,18,318.45 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आहे. या व्यतिरिक्त, कंपनीने विद्यमान भागधारकांना राइट इश्यू जारी करत 53,124 कोटी रुपये जमा केले आहेत.
हेही वाचा
गुगलसोबत मिळून स्मार्टफोन बनवणार, मुकेश अंबानींची मोठी घोषणा
पदव्युत्तर वैद्यकीय मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती नाही ही समाधानाची बाब- अशोक चव्हाण
रिलायन्सचे शेअर्स नव्या उच्चांकांवर; आज होऊ शकतात मोठ्या घोषणा
RBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणतात, येत्या सहा महिन्यांत बुडीत कर्जात होऊ शकते मोठी वाढ
CoronaVirus:लढ्याला यश! देशात Covaxinनंतर कोरोनावरच्या दुसऱ्या स्वदेशी लशीची मानवी चाचणी सुरू
अवघ्या 1000 रुपयांपासून भारत बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करा अन् निश्चित फायदा मिळवा
कौतुकास्पद! IAS ऑफिसरनं दाखवले आपले CBSE बोर्डाच्या परीक्षेचे प्रशस्तिपत्रक अन् म्हणाले....
चीनसोबतच्या संघर्षातही अमेरिका तैवानला देणार घातक PSC 3 क्षेपणास्त्र प्रणाली; जिनपिंग भडकले