लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशनने गुरुवारी स्पष्ट केले की, त्यांनी कर्जाच्या परतफेडीसाठी आपल्या अचल संपत्तीचे मुद्रीकरण (मूल्यमापन) सुरू केले आहे. रिलायन्स कम्युनिकेशनवर ४५ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. कर्जाच्या परतफेडीसाठी बँकांनी सात महिन्यांची मुदत दिलेली आहे. रिलायन्सने सांगितले आहे की, कंपनीने आपल्या रिअल इस्टेटच्या संपत्तीचे मुद्रीकरण सुरू केले आहे. दिल्लीतील रिलायन्सची सेंटर बिल्डिंग विक्रीसाठी किंवा भाडेतत्त्वावर देण्यासाठी कंपनीने जाहिरात दिली आहे. नवी मुंबईतील डीएसीसी आयटी पार्कचाही विक्रीत/भाडेतत्त्वासाठी समावेश आहे. कंपनीवरील कर्ज कमी करण्यासाठी रिलायन्सने हे पाऊल उचलले आहे. रिलायन्स कम्युनिकेशनने ही संपत्ती ब्रकफिल्डला विक्री केल्यास, त्यांना ११ हजार कोटी रुपये मिळणार आहेत.
कर्ज फेडण्यास रिलायन्सच्या संपत्तीचे मूल्यमापन सुरू
By admin | Published: June 24, 2017 3:09 AM