Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेट्रोलपंपांच्या जागांवर रिलायन्सची कॅफे, दुकाने?

पेट्रोलपंपांच्या जागांवर रिलायन्सची कॅफे, दुकाने?

Reliance News: देशातील महामार्गांवर असलेल्या आपल्या पेट्रोलपंपावर रिटेल आऊटलेट सुरू करण्याची योजना रिलायन्स इंडस्ट्रीज आखत असल्याचे वृत्त आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 08:44 AM2021-08-06T08:44:20+5:302021-08-06T08:44:50+5:30

Reliance News: देशातील महामार्गांवर असलेल्या आपल्या पेट्रोलपंपावर रिटेल आऊटलेट सुरू करण्याची योजना रिलायन्स इंडस्ट्रीज आखत असल्याचे वृत्त आहे.

Reliance cafes, shops at petrol pumps? | पेट्रोलपंपांच्या जागांवर रिलायन्सची कॅफे, दुकाने?

पेट्रोलपंपांच्या जागांवर रिलायन्सची कॅफे, दुकाने?

नवी दिल्ली : देशातील महामार्गांवर असलेल्या आपल्या पेट्रोलपंपावर रिटेल आऊटलेट सुरू करण्याची योजना रिलायन्स इंडस्ट्रीज आखत असल्याचे वृत्त आहे.
प्राप्त माहितीनुसार, रिलायन्स आणि ब्रिटिश कंपनी बीपी पीएलसी यांच्या भागीदारीतील ‘रिलायन्स बीपी मोबिलिटी’ कंपनीकडून भारतात किरकोळ विक्रीसाठी पेट्रोल पंप चालविले जातात. तथापि, बदललेल्या परिस्थितीत हे पेट्रोलपंप चालेनासे झाले आहेत. त्यामुळे कंपनीने या पंपांसोबतच नवे व्यवसाय सुरू करण्याची योजना आखली आहे. पंपांवर कॅफे तसेच डिजिटल आणि इलेक्ट्रिक गाड्यांची चार्जिंग केंद्रे सुरू केली जाऊ शकतात. 
वास्तविक रिलायन्स ही कंपनी सरकारी कंपन्यांच्या पंपांपेक्षा एक रुपयाने स्वस्तात पेट्रोल विकते. सुरुवातीला रिलायन्सचे पेट्रोल पंप भरपूर चालतही होते; परंतु हे पेट्रोल पंप अल्पावधीतच बंद पडले होते.   कंपनीने पंप पुन्हा सुरू केले; परंतु ग्राहकांचा म्हणावा तेवढा ओढा रिलायन्सच्या पंपाकडे राहिलेला नाही. 

Web Title: Reliance cafes, shops at petrol pumps?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.