Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुंतवणूकदारांमध्ये खळबळ, 2700 वरुन 11 रुपयांवर आला 'हा' शेअर, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

गुंतवणूकदारांमध्ये खळबळ, 2700 वरुन 11 रुपयांवर आला 'हा' शेअर, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

Reliance Capital Share: 14 फेब्रुवारी रोजी संचालक मंडळाची महत्वाची बैठक.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 09:17 PM2024-02-12T21:17:53+5:302024-02-12T22:49:01+5:30

Reliance Capital Share: 14 फेब्रुवारी रोजी संचालक मंडळाची महत्वाची बैठक.

Reliance Capital Share: Rs. Reliance shares fall to Rs 11 from 2700; Excitement among investors | गुंतवणूकदारांमध्ये खळबळ, 2700 वरुन 11 रुपयांवर आला 'हा' शेअर, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

गुंतवणूकदारांमध्ये खळबळ, 2700 वरुन 11 रुपयांवर आला 'हा' शेअर, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

Reliance Capital Share: उद्योगपती अनिल अंबानी यांची दिवाळखोर कंपनी रिलायन्स कॅपिटलचे शेअर्स सोमवारी(दि.12) फोकसमध्ये होते. याचे कारण म्हणजे, कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू आहे. रिलायन्स कॅपिटलचा शेअर आज 5% घसरुन 11.78 रुपयांवर पोहोचला. रिपोर्टनुसार, रिलायन्स कॅपिटलच्या प्रशासकाने रिलायन्स जनरल इन्शुरन्सच्या बोर्डाला पत्र लिहून कंपनीच्या प्रमुख अधिकाऱ्यांना ₹ 118 कोटी देण्याच्या तरतुदींवर आक्षेप घेतला आहे. 

14 फेब्रुवारी रोजी संचालक मंडळाची बैठक
अलीकडेच रिलायन्स कॅपिटल लिमिटेडने बीएसईला कळवले होते की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 14 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे. यापूर्वी ही बैठक 10 फेब्रुवारीला होणार होती. या बैठकीत इतर गोष्टींसोबतच कंपनीचे डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले जातील. त्यात चालू आर्थिक वर्षातील नऊ महिन्यांचे निकालही असतील. 

शेअर्सची कामगिरी
2008 मध्ये या शेअरची किंमत 2700 रुपयांच्या पातळीवर होती. आज 12 फेब्रुवारी 2024 रोजी हा शेअर 11.78 रुपयांवर आहे. म्हणजेच हा स्टॉक दीर्घ कालावधीत 99% घसरला आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 15.16 रुपये आणि 52 आठवड्यांचा निच्चांक 7.60 रुपये आहे. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 297.69 कोटी रुपये आहे.

अनिल अंबानींची किती हिस्सेदारी ?
रिलायन्स कॅपिटलमध्ये प्रवर्तकाचा किरकोळ हिस्सा 0.88% आहे. सार्वजनिक भागीदारी 98.49% आहे. अनिल अंबानी कुटुंबाकडे वैयक्तिक प्रवर्तकांमध्ये 2,91,961 शेअर्स आहेत. मात्र, त्यातही अनिल अंबानींची हिस्सेदारी आता शून्य झाली आहे. अनिल यांच्या पत्नी टीना अंबानी यांच्याकडे कंपनीचे 2,63,474 शेअर्स आहेत. तर मुलगा जय अनमोल अंबानी यांच्याकडे कंपनीचे 28,487 शेअर्स आहेत. 

(टीप-हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजार जोखमीच्या अधीन आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Reliance Capital Share: Rs. Reliance shares fall to Rs 11 from 2700; Excitement among investors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.