मुंबई : रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) आपल्या वायरलेस व्यवसायाचा मोठा हिस्सा येत्या ३0 दिवसांत बंद करणार असल्याचे वृत्त आहे. कंपनीने कर्मचा-यांना नोटिसा बजावल्या असून, ३0 नोव्हेंबर हा कामाचा शेवटचा दिवस असेल, असे त्यांना सांगण्यात आल्याचे कळते.
रिलायन्स जिओने केलेल्या मोफत योजनेच्या धमाक्यामुळे आरकॉमची आर्थिक स्थिती बिघडली असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांनी सांगितले की, आरकॉमचे कार्यकारी संचालक गुरदीप सिंग यांनी मंगळवारी कंपनीच्या कर्मचा-यांना सांगितले की, ३0 दिवसांत वायरलेस व्यवसायावर पडदा पडेल. आम्ही व्यवसायात प्राण फुंकण्याचा खूप प्रयत्न केले. मात्र, आता परिस्थिती विकोपाला गेली. ३0 दिवसांपेक्षा जास्त दिवस आपण तग धरू शकणार नाही.
रिलायन्स कम्युनिकेशन्स म्हणजेच आरकॉम वायरलेस व्यवसाय बंद करणार?
मुंबई : रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) आपल्या वायरलेस व्यवसायाचा मोठा हिस्सा येत्या ३0 दिवसांत बंद करणार असल्याचे वृत्त आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 04:00 AM2017-10-26T04:00:16+5:302017-10-26T04:00:20+5:30