Join us

₹792 वरून आपटत ₹1 वर आला हा शेअर, आता सातत्यानं देतोय बंपर परतावा; 10 फेब्रुवारीला मोठी बैठक!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2024 7:08 PM

महत्वाचे म्हणजे, गेल्य सहा महिन्यांत हा शअर 55 टक्क्यांनी वधारला आहे. 2008 मध्ये या शेअरची किंमत 792 रुपयांवर पोहोचली होती. अशा पद्धतीने हा शेअर 99 टक्क्यांनी कोसळला आहे.

अनिल अंबानींच्या बहुतेक कंपन्या कर्जात बुडालेल्या आहेत. यामुळे यांचे शेअर्सदेखील वाईट परिस्थितीतून जात आहेत. टेलिकॉम कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडचीही हीच परिस्थिती आहे. या कंपनीच्या शेअरची किंमत 2 रुपयांपेक्षाही कमी आहे.

शेअरचा परफॉर्मन्स -रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या शेअरला शुक्रवारी अर्थात आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी अपर सर्किटला लागले होते. या शेअरची किंमत 4.86% ने वाढून 1.94 रुपयांवर पोहोचली आहे. 13 डिसेंबर 2023 रोजी शेअरची किंमत 2.49 रुपयांवर गेली. हा या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. तर, जून 2023 मध्ये, हा शेअर 1.01 रुपयांवर पोहोचला होता. हा या शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक होता.

महत्वाचे म्हणजे, गेल्य सहा महिन्यांत हा शअर 55 टक्क्यांनी वधारला आहे. 2008 मध्ये या शेअरची किंमत 792 रुपयांवर पोहोचली होती. अशा पद्धतीने हा शेअर 99 टक्क्यांनी कोसळला आहे.

10 फेब्रुवारीला महत्वाची बैठख - रिलायन्स कम्युनिकेशन्ससाठी 10 फेब्रुवारी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या कंपनीने बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जला दिलेल्या माहितीनुसार, 10 फेब्रुवारीला संचालक मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत कंपनीचे डिसेंबर तिमाहीचे निकालही जाहीर करण्यात येणार आहेत. या कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचे झाल्यास, प्रवर्तकांची हिस्सेदारी केवळ 1.85 टक्के आहे. प्रवर्तकांमध्ये अनिल अंबानींकडे 18,59,171 शेअर्स आहेत. तर पत्नी टीना अंबानी यांच्याकडे 16,50,832 शेअर्स आहेत. याशिवाय अनिल अंबानींच्या दोन्ही मुलांकडे जवळपास 16 लाख 70 हजार च्या जवळपास शेअर आहेत.

विकली जाणार आहे कंपनी -नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने अलीकडेच रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या काही रिअल इस्टेट मालमत्तांच्या विक्रीला मान्यता दिली आहे. विक्रिसाठी निश्चित करण्यात आलेल्या संपत्तीत आरकॉम चेन्नई हेड ऑफिसचा समावेश होता. चेन्नईच्या अंबत्तूरमध्ये जवळपास 3.44 एकर लँड आहे. याशिवाय पुण्यातीलही काही संपत्ती विकली जाणार आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक