रिलायन्स फाऊंडेशनने गुजरातमधील जामनगर येथे 'वंतारा' नावाचा एक व्यापक प्राणी बचाव, संवर्धन आणि पुनर्वसन कार्यक्रम जाहीर केला आहे. भारतातील हा अशा प्रकारचा पहिलाच कार्यक्रम आहे. वंतारा कार्यक्रमासंदर्भात बोलताना अनंत अंबानी म्हणाले, "आम्ही कोरोना काळात वन्यजीव बचाव केंद्र सुरू केले. आम्ही 600 एकर जागेवर जंगल तयार केले. हत्तींसाठी पूर्ण अधिवास निर्माण केला. तसेच आम्ही 2008 मध्ये पहिल्या हत्तीचे रेस्क्यू केले. 2020 मध्ये ग्रीन्स झूलॉजिकल रेस्क्यू सेंटर सुरू झाले."
यासंदर्भात बोलताना अनंत अंबानी म्हणाले, आमच्या ग्रीनच्या झुलॉजिकल रिसर्च अँड रेस्क्यू सेंटरसाठी एकूण 3,000 लोक काम करत आहेत. यांपैकी, आमच्याकडे जवळपास 20 ते 30 प्रवासी आहेत. सर्व प्रवासी शिक्षकाच्या भूमिकेत आहेत. ज्यांनी पोषणतज्ज्ञ सारख्या विषयातून पशुवैद्यकीय पदवी पूर्ण केली आहे. अशा पदवीधरांना आम्ही घेतो. आमच्याकडे काही डॉक्टरही आहेत. ज्यांना प्राण्यांप्रति करुणा आहे.
रिलायन्स फाऊंडेशनचे संचालक अनंत अंबानी पुढे म्हणाले, आम्ही २०० हून अधिक हत्तींची सुटका केली आहे आणि त्यांना देशाच्या विविध भागांतून येथे आणले आहे. आम्ही येथे हत्तींची सेवा करतो. हे प्राणी संग्रहालय नसून 'सेवालय' आहे. हा ६०० एकरचा भाग हत्तींचा नैसर्गिक अधिवास म्हणून विकसित करण्यात आला आहे.
आईकडून मिळाली प्रेरणा -
रिलायन्स फाऊंडेशनच्या वंतारा प्रोजेक्टसंदर्भात बोलताना अनंत म्हणाला, मला हा प्रोजेक्ट सुरू करण्याची प्रेरणा माझ्या आईकडून मिळाली. हिंदू धर्मात देवांना प्राणी प्रिय असतात असे म्हटले जाते. यामुळे मला हे प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्र सुरू करण्याची प्रेरणा मिळाली.
#WATCH | Reliance Foundation announces Vantara - a comprehensive Animal Rescue, Care, Conservation and Rehabilitation programme, the first of its kind in India.
— ANI (@ANI) February 26, 2024
Anant Ambani says "We started the wildlife rescue center building in the peak of COVID...We've created a jungle of 600… pic.twitter.com/OoWh9HWsU8
लवकरच लोकांसाठी खुले केले जाणार उद्यान -
"हा माझा पॅशन प्रोजेक्ट आहे. आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाने एक पशुवैद्यकीय रुग्णालयही सुरू केले आहे. रुग्णालयात एमआरआय आणि सीटी स्कॅन मशीन, एंडोस्कोपिक रोबोटिक सर्जरी मशीन आणि ६ सर्जिकल सेंटर्स आहेत. आम्ही येथे रुग्णालयात प्राण्यांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रॉस्थेटिक्सही बसवण्यात आले आहेत. प्राणीशास्त्र उद्यान लवकरच लोकांसाठी खुले केले जाईल, असंही अनंत अंबानीने म्हटलं आहे.