Lokmat Money > बिझनेस न्यूज > नीता अंबानींचा 'सिटिझन ऑफ मुंबई' पुरस्कारानं सन्मान, फोटो शेअर करत दिली माहिती

नीता अंबानींचा 'सिटिझन ऑफ मुंबई' पुरस्कारानं सन्मान, फोटो शेअर करत दिली माहिती

रिलायन्स फाऊंडेशननं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून फोटो शेअर करत या पुरस्काराची माहिती दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 01:07 PM2023-09-27T13:07:44+5:302023-09-27T13:17:23+5:30

रिलायन्स फाऊंडेशननं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून फोटो शेअर करत या पुरस्काराची माहिती दिली.

reliance foundation Nita Ambani honored with rotary club of bombay Citizen of Mumbai award shared photo | नीता अंबानींचा 'सिटिझन ऑफ मुंबई' पुरस्कारानं सन्मान, फोटो शेअर करत दिली माहिती

नीता अंबानींचा 'सिटिझन ऑफ मुंबई' पुरस्कारानं सन्मान, फोटो शेअर करत दिली माहिती

रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांना रोटरी क्लब ऑफ बॉम्बेने प्रतिष्ठित ‘सिटिझन ऑफ मुंबई २०२३-२४’ या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. रिलायन्स फाऊंडेशननं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून फोटो शेअर करत या पुरस्काराची माहिती दिली. परिवर्तन संस्थांच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, क्रीडा, कला, संस्कृती या क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन हा सन्मान देण्यात आला आहे.

नीता अंबानी या इंडियन प्रीमियर लीगच्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सच्या मालक आहेत. त्या फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेडच्या संस्थापक अध्यक्षा आहेत. या कंपनीनं इंडियन सुपर लीग सुरू केली होती. त्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स फॉर ऑल इनिशिएटिव्हच्याही प्रमुख आहेत. मेजर क्रिकेटच्या पहिल्या सीझनची विजेती टीम एमआय न्यूयॉर्कच्याही त्या मालक आहे. ही एक व्यावसायिक अमेरिकन टी २० लीग आहे.



कल्चरल सेंटरची स्थापना
रिलायन्स फाऊंडेशनच्या वेबसाइटनुसार, त्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिली भारतीय महिला सदस्य आहेत. मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट, न्यूयॉर्कच्या बोर्डाच्या मानद विश्वस्त म्हणून निवड झालेल्या त्या पहिल्या भारतीय आहेत. या वर्षी सुरू झालेल्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची (मुंबई) संकल्पना नीता अंबानी यांची होती. भारतातील कला आणि संस्कृती सर्वांसमोर आणण्यासाठी त्यांची मंच उपलब्ध करुन दिला आहे.

काय आहे हा पुरस्कार
सिटीझन ऑफ मुंबई अवॉर्ड हा रोटरी क्लब ऑफ बॉम्बेतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा सन्मान आहे. दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो.

Web Title: reliance foundation Nita Ambani honored with rotary club of bombay Citizen of Mumbai award shared photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.