रिलायन्स जनरल इनश्युरन्स कंपनी लिमिटेड या भारतातील एका आघाडीच्या जनरल इन्श्युरन्स कंपनीने रिलायन्स हेल्थ ग्लोबल ही आरोग्यविमा पॉलिसी तयार केली असून या माध्यमातून भारतीयांना जागतिक पातळीवरील वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे. या पॉलिसीअंतर्गत विम्याचे संरक्षण हे केवळ भारताच्या भौगोलिक सीमेतच नव्हे तर जगभरात प्राप्त होणार आहे. जागतिक जीवनशैली असलेल्या व्यक्तींसाठी आणि जगभरातील वैद्यकीय सेवांचा व पायाभूत सुविधांचा उपयोग करून घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.
रिलायन्स हेल्थ ग्लोबलमध्ये अनेक अतुलनीय फीचर्स आहेत. आरोग्य विम्यामध्ये देण्यात येणाऱ्या सुविधांची कक्षा या पॉलिसीच्या माध्यमातून विस्तारली आहे. परदेशातील उपचारांसाठी देण्यात येणाऱ्या सर्वसमावेशक विमा संरक्षणासोबतच कर्करोग, बायपास शस्त्रक्रिया यासारख्या गंभीर आजारांचाही या विमा पॉलिसीत समावेश आहे. त्यासोबतच असामान्य स्थानिक विमा संरक्षणाचा विचार करता ही पॉलिसी इतर पॉलिसींपेक्षा वेगळी ठरते. या पॉलिसीमध्ये भारतातील विमा संरक्षणाला मर्यादा ठेवलेली नाही. त्यामुळे आरोग्य विम्याच्या प्रस्थापित सुविधांना या पॉलिसीमध्ये भेदण्यात आले आहे आणि पॉलिसीधारकांना अतुलनीय सुरक्षा व मनःशांती प्रदान करण्यात आली आहे.
नियोजित हॉस्पिटलायझेशन व्यतिरिक्त या पॉलिसीमध्ये प्रवास, निवासी व्यवस्था, एंड-टू-एंड व्हिसा व संबंधित सेवा, पासपोर्ट गहाळ होणे वा इमर्जन्सी कॅश यासारख्या अकस्मिक निकडींचाही विचार करण्यात आला आहे. या पॉलिसीअंतर्गत 1 मिलियन अमेरिकन डॉलर इतक्या रकमेचे विमा संरक्षण मिळते. त्यामुळे परदेशात उपचार घेताना एक प्रकारच्या सुरक्षेची खात्री होते.
रिलायन्स ग्लोबल हेल्थ पॉलिसीमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याआधी व नंतरच्या खर्चाचे, सेकंड ओपिनियनचे, अपघात झाल्यास पुनर्वसनासाठी कराव्या लागणाऱ्या उपचारांचे विमा संरक्षण मिळते. त्यामुळे पॉलिसीधारकाच्या आरोग्यसेवा प्रवासाच्या प्रत्येक पावलावर एक भक्कम भागीदार म्हणून रिलायन्स जनरल इन्श्युरन्सचा निर्धार दिसून येतो. हवाई-रुग्णवाहिका, अवयवदात्याचा खर्च, खोलीच्या भाड्यावर मर्यादा नसणे अशा सर्वसमावेशक लाभांसह रिलायन्स हेल्थ ग्लोबल मनःशांती प्रदान करते आणि पॉलिसीधारक व्यक्ती आपली प्रकृती निरोगी करण्यावर आणि शारीरिक हितावर भर देऊ शकते.
रिलायन्स जनरल इन्श्युरन्सचे सीईओ श्री. राकेश जैन म्हणतात, "रिलायन्स हेल्थ ग्लोबल ही क्रांतिकारी आरोग्यविमा पॉलिसी असून या पॉलिसीने सीमांची मर्यादा ओलांडली आहे. जसजसे भारतात जागतिकीकरण पसरत आहे, त्याचबरोबर अनेक भारतीय कामाच्या वा पर्यटनाच्या निमित्ताने परदेशात प्रवास करत आहेत. अशा वेळी भारतासाठी व परदेशासाठी वेगवेगळ्या पॉलिसी खरेदी करण्याचा त्यांचा त्रास वाचविणे महत्त्वाचे आहे. या पॉलिसीमध्ये स्थानिक पातळीवर विमा संरक्षणाच्या रकमेवर कोणतीही मर्यादा नाही आणि जागतिक पातळीवर 10 दशलक्ष डॉलरपर्यंत विमा संरक्षण मिळू शकते. या माध्यमातून आम्ही आरोग्यविमा क्षेत्रात नवा मापदंड निश्चित करू इच्छित आहोत. अखंड सहाय्य व जागतिक आरोग्यसेवा उत्कृष्टता उपलब्ध करून देण्याच्या आमच्या निर्धारातून आम्ही आमच्या मौल्यवान ग्राहकांच्या मनःशांतीची खातरजमा करतो."