Lokmat Money > बिझनेस न्यूज > Reliance Industries: कोका-कोला अन् पेप्सीला 'या' उन्हाळ्यात फोडणार घाम! मुकेश अंबानींनी आणली मोठी योजना

Reliance Industries: कोका-कोला अन् पेप्सीला 'या' उन्हाळ्यात फोडणार घाम! मुकेश अंबानींनी आणली मोठी योजना

रिलायन्स इंडस्ट्रीज FMCG क्षेत्रात झपाट्याने विस्तार करत आहे. कंपनीने गेल्या वर्षी कॅम्पा ब्रँड विकत घेतला होता आणि तो देशभरात लॉन्च करण्याचा विचार करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 08:41 PM2023-04-29T20:41:45+5:302023-04-29T20:43:14+5:30

रिलायन्स इंडस्ट्रीज FMCG क्षेत्रात झपाट्याने विस्तार करत आहे. कंपनीने गेल्या वर्षी कॅम्पा ब्रँड विकत घेतला होता आणि तो देशभरात लॉन्च करण्याचा विचार करत आहे.

reliance has made solid plan to counter coca cola and pepsico | Reliance Industries: कोका-कोला अन् पेप्सीला 'या' उन्हाळ्यात फोडणार घाम! मुकेश अंबानींनी आणली मोठी योजना

Reliance Industries: कोका-कोला अन् पेप्सीला 'या' उन्हाळ्यात फोडणार घाम! मुकेश अंबानींनी आणली मोठी योजना

देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या वर्षी कॅम्पा कोला ब्रँड २२ कोटी रुपयांना विकत घेतला. आता कंपनी देशभरात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. रिलायन्स ग्रुपची FMCG कंपनी रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सने येत्या दोन-तीन आठवड्यात देशभरात लॉन्च करण्याची योजना आखली आहे.

कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉटलिंग ऑपरेशन्स वाढवण्यासाठी नवीन भागीदारांशी बोलणी सुरू आहेत. यासोबतच फळांवर आधारित पेये, सोडा, एनर्जी आणि जिरे ड्रिंक्समध्ये प्रवेश करण्याची योजना आहे. कॅम्पाने नुकतेच २०० मिली कॅनसाठी २० रुपयांमध्ये झिरो शुगर प्रकार लाँच केला आहे. कोका-कोला आणि पेप्सी सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी कॅम्पाने त्यांच्यापेक्षा किमती कमी ठेवल्या आहेत. म्हणजेच येत्या काही दिवसांत कोका-कोला आणि पेप्सीला रिलायन्सकडून तगडे आव्हान मिळणार आहे.

OYO ला अच्छे दिन! कंपनीला झाला मोठा फायदा; IPO साठी नव्याने प्रस्ताव देणार

सध्या, कंपनी आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये कोला, लेमन आणि ऑरेंज प्रकारांसह कॅम्पा विकत आहे. कंपनीने एशियन बेव्हरेजेस या तमिळनाडूस्थित कंपनीसोबत उत्पादन आणि वितरण भागीदारी केली आहे. कंपनी ट्रू आणि यू टू ब्रँड अंतर्गत मिल्क शेक आणि फळ पेय तयार करते. यासोबतच कंपनीने चेन्नईस्थित कंपनी काली एरेटेड वॉटर वर्क्सशीही हातमिळवणी केली आहे. जालान फूड प्रॉडक्ट्स आधीच त्यांच्या आंध्र प्रदेश आणि राजस्थान प्लांट्समध्ये कॅम्पाची बाटली करत आहे.

एशियन बेव्हरेजेस आणि काली एरेटेड यांच्या भागीदारीमुळे आरसीपीएलला दक्षिण बाजारपेठेत मोठी बाजारपेठ मिळण्याची संधी मिळणार आहे, आता कंपनी या सुविधांचा वापर आपल्या राष्ट्रीय विस्तारासाठी करणार आहे. यासह, कंपनी कॅम्पाच्या श्रेणीचे उत्पादन करण्यासाठी गुजरातच्या सोस्या हजूरी बेव्हरेजेसच्या सुविधेचा वापर करेल. या कंपनीत रिलायन्सची ५० टक्के भागीदारी आहे. ज्या मार्केटमध्ये कंपनीचा बॉटलिंग पार्टनर नाही, तिथे ती स्वतःचा बॉटलिंग प्लांट स्थापन करू शकते.

कॅम्पाची उत्पादने प्रत्येक दुकानापर्यंत पोहोचवण्यासाठी आरसीपीएल एक पारंपरिक वितरण नेटवर्क तयार करत आहे. यासोबतच बिझनेस टू बिझनेस प्लॅटफॉर्मवरही काम केले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्पाचा ९० टक्के व्यवसाय पारंपरिक वितरकांच्या माध्यमातून होणार आहे. हे नेटवर्क आंध्र आणि तेलंगणामध्ये तयार करण्यात आले आहे आणि आता हेच मॉडेल इतर राज्यांमध्येही स्वीकारले जात आहे. 

Web Title: reliance has made solid plan to counter coca cola and pepsico

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.