Join us

रिलायन्सचे शेअर्स नव्या उच्चांकांवर; आज होऊ शकतात मोठ्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 2:02 PM

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी फेसबुकसारख्या दिग्गज टेक कंपन्यांशी भागीदारी केल्यानंतर त्यांचा फायदा उचलण्यासाठी काही घोषणाही करू शकतात.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 43व्या एजीएम (RIL 43rd AGM 2020) आधी कंपनीचे शेअर्स विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सची किंमत जवळपास दीड टक्क्यांनी वाढून 2000 रुपयांवर गेली होती. यापूर्वी मंगळवारी हे शेअर्स 1917 रुपयांवर बंद झाले होते. 23 मार्च रोजी 867 रुपयांच्या नीचांक असलेले शेअर्स तुलनेत 125 टक्क्यांनी वाढले आहेत. ही भरभराट 4 महिन्यांहून अधिक काळात झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी फेसबुकसारख्या दिग्गज टेक कंपन्यांशी भागीदारी केल्यानंतर त्यांचा फायदा उचलण्यासाठी काही घोषणाही करू शकतात. असा अंदाज आहे की, या एजीएममध्ये मुकेश अंबानी आपली प्रमुख कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजमधील तेल रसायनांमध्ये बदल करण्याच्या प्रमुख विस्तार योजनेबद्दल भागधारकांनाही माहिती देतील.जगभरातील गुंतवणूकदारांकडून मिळालेल्या चांगल्या प्रतिक्रियेनंतर जिओ प्लॅटफॉर्मची लिस्टिंगसंदर्भात घोषणा केली जाऊ शकते. त्यामध्ये गुंतवणूक वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारात कंपनीनं लिस्टिंग करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच कंपनी जियो फायबर आणि 5 जीसंदर्भात नवीन घोषणा देखील करू शकते. इंडिट्रेड कॅपिटलचे सुदीप बंडोपाध्याय यांनी बिझिनेस स्टँडर्डला सांगितले आहे की, कंपनी Jio प्लॅटफॉर्मसाठी काय योजना आखेल हे कंपनीच सांगू शकते. सूचीबद्ध टाइमलाइनबरोबरच कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग भारतीय स्टॉक एक्सचेंजवर होणार की आंतरराष्ट्रीय बाजारात हे जाणून घेणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे. कंपनीत क्वालकॉम वेंचर्सच्या गुंतवणुकीबाबत विश्लेषकांना असा विश्वास आहे की, कंपनीच्या 5जी रोलआऊटमध्ये ही महत्त्वाची भूमिका बजावू शकते. क्वालकॉम व्हेंचर्स हा क्वालकॉमचा जागतिक फंड आहे जो 5जी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, ऑटोमोटिव्ह, नेटवर्किंग आणि एंटरप्राइझ जगभरात कार्यरत असलेल्या उत्कृष्ट कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. या व्यतिरिक्त एजीएममधून कोणता उदयोन्मुख व्यवसाय व्यवस्थापनाकडे कंपनी डोकावत आहे याचा अंदाज घेतला जाणार आहे.काळाआधी कर्जमुक्तीचं आश्वासन- कोरोनाच्या संकटकाळातही गुंतवणूकदारांच्या वतीने त्याच्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे प्रचंड गुंतवणूक आणण्यात कंपनी यशस्वी ठरली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या डिजिटल जिओ प्लॅटफॉर्मवर २२ एप्रिल ते १२ जुलै या कालावधीत एकूण 25.24 टक्क्यांच्या विक्रीतून कंपनीला 1,18,318.45 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आहे. या व्यतिरिक्त, कंपनीने विद्यमान भागधारकांना राइट इश्यू जारी करत 53,124 कोटी रुपये जमा केले आहेत.

हेही वाचा

RBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणतात, येत्या सहा महिन्यांत बुडीत कर्जात होऊ शकते मोठी वाढ

अवघ्या 1000 रुपयांपासून भारत बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करा अन् निश्चित फायदा मिळवा

कौतुकास्पद! IAS ऑफिसरनं दाखवले आपले CBSE बोर्डाच्या परीक्षेचे प्रशस्तिपत्रक अन् म्हणाले....

चीनसोबतच्या संघर्षातही अमेरिका तैवानला देणार घातक PSC 3 क्षेपणास्त्र प्रणाली; जिनपिंग भडकले

बोगस रेशन कार्डवर आता मिळणार नाही तांदूळ अन् गहू; 'अशा' पद्धतीनं वगळलं जाणार नाव

NCLनं १०वी पास असलेल्यांसाठी काढली मोठी नोकरभरती; असा करा अर्ज...

20 लाख रुपये किलोनं विकला जातो भारतातील 'हा' किडा, पण चीननं सगळा 'राडा' केला!

अमेरिकेच्या प्रभावात असलेल्या भारताला इराणचा झटका; 'या' मोठ्या परियोजनेतून केलं बाहेर

टॅग्स :मुकेश अंबानी