Join us

Reliance Bonus Share : Reliance Industries देतेय एकावर एक शेअर फ्री; गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 1:14 PM

Reliance Industries Bonus Share: देशातील सर्वात मोठी मार्केट कॅप कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजनं बोनस शेअरची घोषणा केली आहे.

Reliance Industries Bonus Share: देशातील सर्वात मोठी मार्केट कॅप कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजनं बोनस शेअरची घोषणा केली आहे. मुकेश अंबानी यांची कंपनी एका शेअरसाठी एक बोनस शेअर देणारे. रिलायन्स इंडस्ट्रीजनं २८ ऑक्टोबर २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांचे नाव या दिवशी कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये राहील, त्यांना एका शेअरवर एका शेअरचा फायदा होणार आहे.

... त्यांना मोफत शेअर्स मिळणार

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बोनस इश्यूच्या घोषणेचा फायदा घ्यायचा असेल तर आजच शेअर्स खरेदी करावे लागतील. कंपनी आज एक्स-बोनस ट्रेड करत आहे. रेकॉर्ड डेट ही ती तारीख आहे जेव्हा कंपनी त्यांचे रकॉर्ड तापसते. ज्या गुंतवणूकदारांचं नाव त्या दिवशी कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये राहील, त्यांनाच बोनस शेअर्सचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच, रेकॉर्ड डेटच्या एक दिवस आधी शेअर्स खरेदी करावे लागतात. अन्यथा ते डीमॅट खात्यात जमा करता येत नाही.

सहाव्यांदा बोनस शेअर्स देणार

रिलायन्स इंडस्ट्रीजने यापूर्वी ५ वेळा बोनस शेअर्स दिले आहेत. कंपनी २०१७ नंतर प्रथमच गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देत आहे. २००९ मध्ये मुकेश अंबानी यांच्या या कंपनीनं एका शेअरसाठी एक शेअर बोनस दिला होता.

कंपनीच्या निव्वळ नफ्यात घट

सप्टेंबर तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात ४.८ टक्क्यांची घट झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा १६,५६३ कोटी रुपये होता. या कालावधीत कंपनीचा महसूल २.३२ लाख कोटी रुपये झालाय. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा Ebitda ४३,९३४ कोटी रुपये होता.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेण आवश्यक आहे.)

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानी