Lokmat Money > बिझनेस न्यूज > Mukesh Ambani Reliance : मुकेश अंबानींचा मोठा निर्णय, सलग दुसऱ्या वर्षीही घेतलं नाही वेतन

Mukesh Ambani Reliance : मुकेश अंबानींचा मोठा निर्णय, सलग दुसऱ्या वर्षीही घेतलं नाही वेतन

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी सलग दुसर्‍या वर्षी त्यांच्या कंपनीकडून कोणतंही वेतन घेतलं नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 02:41 PM2022-08-08T14:41:08+5:302022-08-08T14:41:36+5:30

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी सलग दुसर्‍या वर्षी त्यांच्या कंपनीकडून कोणतंही वेतन घेतलं नाही.

reliance industries mukesh ambani big decision did not take any salary for the second consecutive year neeta ambani | Mukesh Ambani Reliance : मुकेश अंबानींचा मोठा निर्णय, सलग दुसऱ्या वर्षीही घेतलं नाही वेतन

Mukesh Ambani Reliance : मुकेश अंबानींचा मोठा निर्णय, सलग दुसऱ्या वर्षीही घेतलं नाही वेतन

अब्जाधीश उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी सलग दुसर्‍या वर्षी त्यांच्या कंपनीकडून कोणतंही वेतन घेतलं नाही. कोरोना विषाणूच्या साथीमुळे व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याने अंबानी यांनी कंपनीकडून पगार न घेण्याचा निर्णय घेतला होता.

रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या ताज्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की 2020-21 या आर्थिक वर्षासाठी मुकेश अंबानींचा पगार 'शून्य' होता. म्हणजेच एमडी आणि अध्यक्ष म्हणून काम करण्यासाठी कंपनीने त्यांना कोणतेही वेतन दिलेले नाही. मुकेश अंबानी यांनी जून 2020 मध्ये स्वेच्छेने 2020-21 या आर्थिक वर्षाचे वेतन न घेण्याचा निर्णय घेतला होता. कोरोना विषाणूच्या महासाथीमुळे त्यांनी हा निर्णय घेतला. दरम्यान, आता अंबानींनी 2021-22 मध्येही त्यांचे वेतन घेतले नसल्याची माहिती समोर आली आहे.

या दोन्ही वर्षांत त्यांनी अध्यक्ष आणि एमडी या भूमिकेसाठी रिलायन्सकडून कोणतेही भत्ते, सेवानिवृत्ती लाभ, कमिशन किंवा स्टॉक पर्यायांचा लाभ घेतला नाही. तत्पूर्वी, वैयक्तिक उदाहरण देत, त्यांनी 2008-09 पासून अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांचे वेतन 15 कोटी रुपये केले होते. त्यांचे चुलत भाऊ निखिल आणि हेतल मेसवानी यांचा पगार या काळात 24 कोटी रुपये होता. मात्र यावेळी यात १७.२८ कोटी रुपयांचे कमिशन होते. कार्यकारी संचालक पीएमएस प्रसाद आणि पवन कुमार कपिल यांच्या पगारात थोडीशी घट झाली आहे.

नीता अंबानींना नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर
मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी, जे कंपनीच्या संचालक मंडळावर नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर. त्यांना यंदा पाच लाख रुपये सिटिंग फी आणि 2 कोटी रुपये कम्पेनसेशन म्हणून देण्यात आले आहे. गेल्या वर्षी त्यांना 8 लाख रुपये सिटिंग फी आणि 1.65 कोटी रुपये कम्पेनसेशन म्हणून देण्यात आले होते.

Web Title: reliance industries mukesh ambani big decision did not take any salary for the second consecutive year neeta ambani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.