Lokmat Money > बिझनेस न्यूज > रिलायन्स समुहातील कर्मचारी, मुकेश अंबानींपेक्षा जास्त पगार घेतो; जाणून घ्या कोण आहे तो...

रिलायन्स समुहातील कर्मचारी, मुकेश अंबानींपेक्षा जास्त पगार घेतो; जाणून घ्या कोण आहे तो...

Reliance Industries News: देशातील दिग्गज उद्योगपती आणि रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्याकडे सुमारे 920,920 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 03:14 PM2024-05-10T15:14:42+5:302024-05-10T15:15:11+5:30

Reliance Industries News: देशातील दिग्गज उद्योगपती आणि रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्याकडे सुमारे 920,920 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Reliance Industries News: Reliance Group employee Nikhil Meswani earns more than Mukesh Ambani | रिलायन्स समुहातील कर्मचारी, मुकेश अंबानींपेक्षा जास्त पगार घेतो; जाणून घ्या कोण आहे तो...

रिलायन्स समुहातील कर्मचारी, मुकेश अंबानींपेक्षा जास्त पगार घेतो; जाणून घ्या कोण आहे तो...

Reliance Industries News: देशातील दिग्गज उद्योगपती आणि रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची संपत्ती सुमारे 920,920 कोटी रुपये आहे. रिलायन्स सध्या देशातील सर्वात मोठा उद्योग समूह असून, त्याचे मार्केट कॅप 1,887,000 कोटींपेक्षा जास्त आहे. मुकेश अंबानी रिलायन्स समुहातील विविध कंपन्यांची जबाबदारी सांभाळतात. यात त्यांना नीता अंबानी, ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांच्यासह अनेक सहकाऱ्यांची मदत मिळते. यातील एक सहकारी असा आहे, ज्याचा पगार अंबानी यांच्यापेक्षा जास्त आहे. 

कोण आहेत निखिल मेसवानी?
मीडिया रिपोर्ट्स के मुताबिक, निखिल मेसवानी यांची वार्षिक पगार 24 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. निखिल मेसवानी यांचे वडील रसिकलाल मेसवानी आणि धीरुभाई अंबानी चुलत भाऊ आहेत. ते मुकेश अंबानी यांचे पहिले बॉस आणि गुरु असण्यासोबतच रिलायन्सच्या फाउंडर डायरेक्टर्सपैकी एक होते. सध्या निखिल यांना मिळणारी पगार अंबानी कुटुंबापेक्षा जास्त आहे. त्यांनी 1986 मध्ये रिलायन्समध्ये प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून आपल्या कामाला सुरुवात केली आणि 1 जुलै 1988 मध्ये कंपनीच्या बोर्डात एग्झेक्यूटिव्ह डायरेक्टर झाले. रिलायन्सच्या पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीला वाढवण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. 

मुकेश अंबानींपेक्षा जास्त पगार
रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी गेल्या काही वर्षात एकही रुपया पगार घेतलेला नाही. पण, 2019-20 या आर्थिक वर्षात त्यांचा पगार सूमारे 15 कोटी रुपये होते. निखिल मेसवानी यांच्या पगाराशी तुलना केल्यास मुकेश अंबानी यांना कमी पगार मिळतो.
 

Web Title: Reliance Industries News: Reliance Group employee Nikhil Meswani earns more than Mukesh Ambani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.