Lokmat Money > बिझनेस न्यूज > केवळ २००₹ प्लॅन, महिनाभर व्हॅलिडटी, डेटा-कॉलिंग फ्री; Airtel-Vi ला टक्कर

केवळ २००₹ प्लॅन, महिनाभर व्हॅलिडटी, डेटा-कॉलिंग फ्री; Airtel-Vi ला टक्कर

Reliance Jio च्या या प्लॅनची किंमत २०० रूपये आहे. यात एका महिन्यासाठी डेटा आणि कॉलिंग ऑफर करण्यात येत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 02:03 PM2022-07-18T14:03:19+5:302022-07-18T14:03:34+5:30

Reliance Jio च्या या प्लॅनची किंमत २०० रूपये आहे. यात एका महिन्यासाठी डेटा आणि कॉलिंग ऑफर करण्यात येत आहे. 

reliance jio 209 plan with 28 days validity vs airtel and vi recharg know more details | केवळ २००₹ प्लॅन, महिनाभर व्हॅलिडटी, डेटा-कॉलिंग फ्री; Airtel-Vi ला टक्कर

केवळ २००₹ प्लॅन, महिनाभर व्हॅलिडटी, डेटा-कॉलिंग फ्री; Airtel-Vi ला टक्कर

रिलायन्स जिओचा एक स्वस्त प्लॅन सध्या अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. जिओच्या या प्लॅनची ​​किंमत जवळपास २०० रुपये आहे. यामध्ये तुम्हाला १ महिन्यासाठी डेटा आणि कॉलिंग दिले जाते. इतर कंपन्यांच्या तुलनेत हा प्लॅन स्वस्त आहे. चला जाणून घेऊया रिलायन्स जिओच्या या प्लॅन विषयी अधिक माहिती.

रिलायन्स जिओ २०९ रूपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओच्या या स्वस्त प्लॅनमध्ये अनेक उत्तम सुविधा मिळतात. यात ग्राहकांना २८ दिवसांची वैधता दिली जाते. तसंच दररोज १ जीबी डेटाही देण्यात येतो. याशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस दिले जातात. या प्लॅनमध्ये जिओ अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही मिळतं. 

एअरटेलचा २६५ रूपयांचा प्लॅन 
एअरटेलचा अशा सुविधांसह मिळणारा प्लॅन हा २६५ रूपयांचा आहे. याची किंमत जिओच्या प्लॅनपेक्षा ५६ रूपयांनी अधिक आहे. या प्लॅनमध्ये २८ दिवसांसाठी रोज १ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय कंपनी यासोबत हॅलोट्यून्स आणि विंक म्युझिकचं मोफत अॅक्सेसही देते.

Vi चा २५६ रूपयांचा प्लॅन
व्होडाफोन आयडिया या कंपनीकडेही अशाच प्रकारचा २६९ रूपयांचा प्लॅन उपलब्ध आहे. यातही २८ दिवसांकरिता रोज १ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि दररोज १०० एसएमएस देण्यात येतात. यात Vi Movies & TV Basic चं सबस्क्रिप्शन देण्यात येतं.

Web Title: reliance jio 209 plan with 28 days validity vs airtel and vi recharg know more details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.