सध्या Reliance Jio, Airtel, Vodafone-Idea या कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी अनेक चांगले प्लॅन्स आणि ऑफर्स आणत आहेत. रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना २ जीबी डेटा देणारे अनेक प्लॅन्स ऑफर करतेय. निरनिराळी किंमत असलेल्या या प्लॅन्समध्ये २८ दिवसांपासून ३६५ दिवसांपर्यंतची वैधता देण्यात येते. अशा परिस्थितीत ग्राहकांना आपल्या आवडीचा प्लॅन निवडण्यात अडचणी येतात. आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशा प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला १५४ रूपये कमी देऊन तेवढीच वैधता आणि डेटा मिळेल. रिलायन्स जिओच्या सर्वच प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा देण्यात येते.
जर तुम्ही दररोज २ जीबी डेटा मिळणाऱ्या प्लॅनच्या (jio 2gb per day plan) शोधात असाल तर तुमची नजर नक्कीट ४४४ रुपये आणि ५९८ रुपयांच्या प्लॅनवर गेली असेल. यापैकी कोणता प्लॅन चांगला असेल हे पाहूया.
४४४ रूपयांचा प्लॅनरिलायन्स जिओच्या ४४४ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा देण्यात येतो. या या प्लॅनची वैधता ५६ दिवसांची आहे. याचाच अर्थ यासोबत ग्राहकांना एकूण ११२ जीबी डेटा मिळतो. यासोबतच ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसचा लाभही मिळतो. या प्लॅनमध्ये JioTv आणि JioCinema सारख्या अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही देण्यात येतं.
५९८ रुपयांचा प्लॅनया प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा आणि ५६ दिवसांची वैधता मिळते. या प्रमाणे या प्लॅनसोबतदेखील ग्राहकांना ११२ जीबी डेटा देण्यात येतो. या प्लॅनसोबतही अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा, तसंच जिओ अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शन देण्यात येतं. या प्लॅनमध्ये ग्राहकांना १ वर्षांसाठी Disney+ Hotstar चं सबस्क्रिप्शनदेखील मिळतं.
कोणत्या प्लॅनमध्ये फायदा?रिलायन्स जिओच्या ५९८ रुपये आणि ४४४ रुपयांच्या प्लॅनमध्ये सारखीच व्हॅलिडिटी आणि डेटा देण्यात येतो. परंतु ४४४ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना Disney+ Hotstar चं सबस्क्रिप्शन देम्यात येत नाही. जर तुम्हाला Disney+ Hotstar नको असेल तर तुम्ही १५४ रूपये वाचवून ४४४ रुपयांचा प्लॅन खरेदी करू शकता.