नवी दिल्ली : Reliance Jio, Airtel, Vi आणि BSNL आपल्या ग्राहकांसाठी अनेक डेटा प्रीपेड प्लॅन ऑफर करतात. बहुतेक लोक कमी खर्चात अधिक बेनिफिट्स असलेले प्लॅन शोधत असतात. अशा परिस्थितीत, सर्वात लोकप्रिय 1.5GB डेली डेटा प्लॅन्स आहेत. युजर्संना अशा प्लॅनचीही गरज असते, जे फक्त स्वस्त नसून दीर्घ वैधता कालावधीसह येतात. टेलिकॉम मार्केटमधील दोन प्रमुख खाजगी कंपन्या Jio आणि Airtel जवळपास सारखाच 1.5GB डेली डेटा प्लॅन ऑफर करतात. परंतु फायदे आणि ऑफरमध्ये फरक आहे.
Jio चा 56 दिवसांचा प्लॅन
Jio कंपनी एक मिड-टर्म 1.5GB डेली डेटा प्रीपेड प्लॅन ऑफर करते. युजर्स हा प्रीपेड प्लॅन मिळवू शकतात, ज्याची किंमत 479 रुपये आहे आणि 56 दिवसांच्या वैधतेसाठी दररोज 1.5GB डेटा मिळू शकतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स आणि 100 एसएमएस दररोज तसेच Jio अॅप्लिकेशन्सचा अॅक्सेस आहे. Jio अॅप्लिकेशन्समध्ये Jio Cinema, Jio TV आणि आणखी काही समाविष्ट आहेत.
Airtel चा 56 दिवसांचा प्लॅन
दुसरीकडे, Airtel ची मिड-टर्म प्लॅन किंमतीच्या बाबतीत Jio सारखीच आहे. Airtel कंपनी एक प्रीपेड प्लॅन ऑफर करते, ज्याची किंमत 479 रुपये आहे. या प्लॅनमध्ये 56 दिवसांच्या वैधतेसाठी दररोज 1.5GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. तसेच, मोबाइल एडिशन Amazon Prime Video फ्री ट्रायल आणि इतर काही बेनिफिट्स आहेत.
का आहे Jio चा प्लॅन शानदार?
जरी असे दिसते की दोन्ही टेलिकॉम कंपन्यांच्या प्लॅनची किंमत सारखीच आहे, ती प्रत्यक्षात वेगळी आहे. कारण Jio चा नमूद केलेला 1.5GB प्लॅन आपल्या JioMart Maha कॅशबॅक ऑफर अंतर्गत येतो. जो युजर्संना प्लॅनवर 20 टक्के सूट देतो. अशा प्रकारे Jio चा प्रीपेड प्लॅन एअरटेलपेक्षा किंचित स्वस्त आहे.