Join us

Reliance Jio : पैसा वसूल प्लॅन्स, डेटाचं टेन्शन नाही; १५ रूपयांपासून सुरू, मिळतोय १२ जीबीपर्यंत डेटा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 4:00 PM

ऑफिसचे काम असो, ऑनलाइन अभ्यास असो किंवा खरेदी असो, प्रत्येक गोष्टीसाठी डेटा आवश्यक असतो.

आजच्या काळात इंटरनेटशिवाय एक मिनिटही राहणे अशक्य झाले आहे. ऑफिसचे काम असो, ऑनलाइन अभ्यास असो किंवा खरेदी असो, प्रत्येक गोष्टीसाठी डेटा आवश्यक असतो. टेलिकॉम कंपन्या अनेक प्रकारचे प्लॅन प्रदान करतात ज्यात दररोज 1 GB, 1.5 GB आणि 2 GB पर्यंत डेटा मिळतो. पण इंटरनेटच्या वाढत्या गरजेमुळे रोजचा डेटा संपायला वेळ लागत नाही. कधीकधी तातडीचे काम करत असतो आणि आपला डेटा संपतो. अशा स्थितीत महत्त्वाचे काम कसे उरकायचे, हे अवघड होऊन बसते. आज आम्‍ही तुम्‍हाला जिओच्‍या काही स्वस्त प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत. याचा वापर करून तुम्ही डेटा संपल्‍यानंतर रिचार्ज करू शकता.

रिलायन्स जिओकडे सध्या एकूण चार डेटा व्हाउचर्स आहेत. हे 4G डेटा व्हाउचर डेटा अॅड-ऑन प्लॅनपेक्षा वेगळे आहेत. जेव्हा जेव्हा तुमचा सामान्य प्रीपेड प्लॅन संपेल तेव्हा डेटा व्हाउचर देखील काम करणार नाही. तुमच्या सामान्य प्लॅनच्या व्हॅलिडिटीपर्यंत या पॅक्सची व्हॅलिडिटी असते.

JioRs 15 Voucher: रिलायन्स जिओचे १५ रूपयांचे व्हाउचर बाजारात उपलब्ध असलेले सर्वात स्वस्त 4G डेटा व्हाउचर आहे. या डेटा व्हाउचरसोबत ग्राहकांना १ जीबी डेटा मिळतो.

JioRs 25 Voucher: रिलायन्स जिओचे २५ रूपयांचे 4G डेटा व्हाउचर २ जीबी डेटासह येतो.

JioRs 61 Voucher: रिलायन्स जिओचा ६१ रूपयांचा प्लॅन ६ जीबी डेटा सह येतो. याची वैधताही तुमच्या मूळ प्लॅन इतकी आहे.

JioRs 121 Voucher: या प्लॅनची वैधतादेखील अॅक्टिव्ह प्लॅनइतकीच असेल. यामध्ये ग्राहकांना दररोज १२ जीबी डेटा देण्यात येतो.

टॅग्स :रिलायन्स जिओइंटरनेट