Join us  

Airtel-Vi ची उडाली झोप! Jio भन्नाट प्लान; ७५जीबी डेटा अन् अनेक बेनिफिट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2022 2:29 PM

जिओचा प्लान एअरटेल आणि व्हीआय या दोन्ही कंपन्यांना चितपट करणार ठरत असल्याचे सांगितले जात आहे.

नवी दिल्ली: आताच्या घडीला टेलिकॉम क्षेत्रात तीव्र स्पर्धा सुरू आहे. जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडियासह अन्य कंपन्या आपल्या ग्राहकांना अनेकविध उत्तमोत्तम प्लान ऑफर करत आहेत. सध्या जिओ आघाडीवर असून, अन्य कंपन्या तगडी टक्कर देत आहेत. मात्र, जिओने आपल्या युझर्ससाठी एक भन्नाट प्लान आणला असून, यामुळे Airtel आणि Vi ची झोप उडणार असल्याचे सांगितले जात आहे. 

रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाकडे स्वस्त प्रीपेड प्लान्सची मोठी लिस्ट आहे. मात्र, कंपन्यांकडे काही स्वस्त पोस्टपेड प्लान्सदेखील उपलब्ध असून, यात ग्राहकांना जबरदस्त बेनिफिट्स मिळत आहेत. जिओकडे एक स्वस्त पोस्टपेड प्लान उपलब्ध आहे. कंपनीकडे ३९९ रुपयांचा प्लान असून, यात डेटासह डिज्नी प्लस हॉटस्टार, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन मोफत दिले जातेय. याच किंमतीत एअरटेल आणि वोडाफोन आयडियाकडे देखील प्लान उपलब्ध आहेत. मात्र, जिओचा प्लान या दोन्ही कंपन्यांना चितपट करणार ठरत असल्याचे सांगितले जात आहे. 

१ जीबी डेटासाठी १० रुपये खर्च करावे लागतील

जिओकडे ३९९ रुपये किंमतीचा शानदार पोस्टपेड प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये कंपनी एकूण ७५ जीबी डेटा देत आहे. डेटा लिमिट समाप्त झाल्यानंतर प्रत्येक १ जीबी डेटासाठी १० रुपये खर्च करावे लागतील. प्लानमध्ये २०० जीबी डेटा रोलओव्हरची देखील सुविधा दिली जात आहे. या प्लानमध्ये देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. यासह या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस मोफत मिळतात. प्लानमध्ये जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. तसेच, अतिरिक्त बेनिफिट्समध्ये नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि डिज्नी+हॉटस्टारचा मोफत अ‍ॅक्सेस मिळतो.

Airtel आणि Vi काय ऑफर करते?

Airtel आणि Vi कडे ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये ४० जीबी + १५० जीबी अतिरिक्त डेटाचा फायदा मिळतो. तसेच, दररोज १०० एसएमएस मोफत आणि अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळत आहे. याशिवाय या प्लानमध्ये २०० जीबीपर्यंत डेटा रोलओव्हरची सुविधा देत आहे. या पोस्टपेड प्लानमध्ये Vi Movies and TV अ‍ॅपचा मोफत अ‍ॅक्सेस मिळतो. तसेच, एअरटेलकडे याच किंमतीचा पोस्टपेड प्लान उपलब्ध आहे. एअरटेलच्या या प्लानमध्ये एकूण ४० जीबी डेटा, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय विंक म्यूझिकसह एअरटेल Xstream अ‍ॅपचा मोफत अ‍ॅक्सेस दिला जात आहे. 

टॅग्स :रिलायन्स जिओएअरटेलव्होडाफोनआयडिया