Join us

21 जीबी डेटा, अनलिमिटेड कॅालिंग आणि SMS; पाहा Jio चा स्वस्त आणि मस्त प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 3:57 PM

रिलायन्स जिओने अलीकडेच प्रीपेड प्लॅन महाग केले आहेत. यातच आता SMS बेनिफीट असलेला एक नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे.

रिलायन्स जिओने (Reliance Jio) या महिन्याच्या सुरुवातीला आपल्या प्रीपेड प्लॅनला रिव्हाइज केले होते. आता हे प्लॅन्स पूर्वीपेक्षा जास्त महाग झाले आहेत. परंतु, एअरटेल (Airtel) आणि व्ही (Vi) च्या तुलनेत जिओच्या प्लॅन्सची किंमत थोडी कमी आहे. यातच आता जिओने SMS बेनिफीटसह एक परवडणारा प्लॅन लॉन्च केला आहे.

जिओचा 119 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

जिओच्या 119 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा दिला जातो. याशिवाय या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर 300 एसएमएससह अमर्यादित व्हॉइस कॉल्स दिले जातात. या प्लानची वैधता फक्त 14 दिवसांची आहे. Jio च्या या प्रीपेड प्लानमध्ये Jio Cinema, Jio TV, Jio Security आणि Jio Cloud सारख्या अॅप्सचे अॅक्सेस आहे. 1.5GB देली डेटा संपल्यानंतर, नेट स्पीड 64kbps पर्यंत घसरते. यामुळे हा प्लॅन SMS फायदे आणि एकूण 21GB डेटासह परवडणारा आहे.

इतर नेटवर्कमध्ये पोर्ट करण्यास सोपेया प्लॅनमध्ये फ्री एसएमएस असल्यामुळे ग्राहकांना इतर कोणत्याही नेटवर्कवर पोर्ट करणे सोपे होईल. दरम्यान, एअरटेलचा सर्वात स्वस्त एसएमएस बेनिफिट असलेला प्लॅन 128 रुपयांना आहे. पण, हा ही प्लॅन अमर्यादित नाही. व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएससाठी यूझरला मुख्य बॅलेन्समधून पैसे द्यावे लागतील. Vi 179 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह SMS फायदे देते. हा पॅक अशा वेळी आला आहे जेव्हा ट्रायने टेलिकॉम नेटवर्कला कोणत्याही नेटवर्कवर पोर्ट करण्यासाठी यूझरला एसएमएसचा लाभ देण्याचे आदेश दिले आहेत. 

टॅग्स :रिलायन्स जिओमुकेश अंबानीएअरटेल