Join us  

Reliance Jio चा नवा प्लॅन लॉन्च; Netflix आणि Amazon सह सर्वकाही फ्री! पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 4:19 PM

Reliance Jio Plan : जिओने एक खास प्लान लॉन्च केला आहे ज्यामध्ये १५ ओटीटी ॲप्सचे मोफत सुविधा मिळणार आहे

Reliance Jio : रिलाएन्स जिओचा एक नवीन पोस्टपेड प्लॅन नुकताच लाँच करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला वेगळा रिचार्ज करण्याची अजिबात गरज नाही. कारण अमर्यादित डेटासह, नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन सारख्या सर्व आवश्यक ओटीटी ॲप्ससह एकूण १५ ॲप्सचे सबस्क्रिप्शन या प्लॅनमध्ये तुम्हाला मोफत मिळणार आहे. जर तुम्हाला सातत्याने व्हॉट्सॲपवर व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल्स करायला आवडत असतील, तर हा प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट आहे. हा प्लॅन जिओ फायबर आणि जिओ एअर फायबर या दोन्ही युजर्संना वापरता येणार आहे. हा मासिक प्लॅन केवळ ८८८ रुपयांचा आहे.

जिओच्या या नव्या प्लॅनमध्ये युजर्सना ३० एमबीपीएस स्पीडसह अनलिमिटेड डेटा देण्यात येणार आहे. यासोबत नेटफ्लिक्सचा बेसिक प्लॅन, ॲमेझॉन प्राईम, जिओ सिनेमा सारख्या १५ ओटीटी प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाणार आहे. त्यामुळे युजरला एकाच प्लॅनमध्ये ओटीटी स्ट्रिमिंगसह अनलिमिटेड डेटादेखील मिळणार आहे.

जर तुम्ही जिओचा प्रीपेड प्लान वापरत असाल तर तुम्ही ८८८ रुपयांतच या प्लॅनचा आनंद घेऊ शकता. सध्याचे सर्व युजर्स हे नवीन पोस्टपेड प्लॅनमध्ये सहजपणे अपग्रेड करू शकतात, असं कंपनीने म्हटलं आहे. मात्र या प्लॅनमध्ये तुम्हाला व्हॉईस कॉलिंग आणि मेसेजिंगची सुविधा मिळणार नाही, हे लक्षात ठेवावं लागणार आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे नुकतीच लाँच झालेली जिओ आयपीएल धन धना धन ऑफर देखील या प्लॅनसोबतच मिळणार आहे. जिओ फायबर असो किंवा जिओ एअर फायबर ग्राहकांना त्यांच्या जिओ होम ब्रॉडबँड कनेक्शनवर ५० दिवसांचे डिस्काउंट क्रेडिट व्हाउचर मिळू शकेल. जिओ आयपीएल धन धना धन ऑफर ३१ मे २०२४ पर्यंत लागू असणार आहे. ही जिओ धन धना धन ऑफर खास आयपीएल सीझनसाठी तयार करण्यात आली आहे. 

टॅग्स :तंत्रज्ञानजिओनेटफ्लिक्सअ‍ॅमेझॉन