देशातील तीन प्रमुख इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्याJio, Airtel आणि BSNL च्ग्राहकांसाठी विविध प्लॅन्स ऑफर करतात. या कंपन्यांच्या काही ब्रॉडबँड प्लॅनची किंमत सारखीच आहे, परंतु त्यांच्यासोबत मिळणाऱ्या फायद्यांमध्ये मोठा फरक आहे. आपण Jio, Airtel आणि BSNLच्या 100 Mbps ब्रॉडबँड प्लॅन्सची तुलना करणार आहोत. पाहू कोणत्या कंपनीचा प्लॅन आहे बेस्ट.
JioFiber 100 Mbps Plans
सर्वप्रथम, JioFiber च्या ३० दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनबद्दल सांगायचे तर, त्याची किंमत 699 रुपये आहे आणि या प्लॅनमध्ये 100 Mbps इंटरनेट स्पीड देण्यात येतो. या प्लॅनची डेटा मर्यादा 3300GB किंवा 3.3TB आहे. ग्राहकांना या प्लॅनसह 100 Mbps चा सिमेट्रिकल अपलोड आणि डाउनलोड स्पीडचा अॅक्सेस मिळतो.
Airtel 100 Mbps Plans
एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर 1Gbps पर्यंत हाय-स्पीड इंटरनेट प्रदान करू शकते, दरम्या, कंपनी इंटरनेट स्पीडसह काही परवडणारे प्लॅन्स देखील ऑफर करते. फायबर ऑप्टिक इंटरनेट कनेक्शन एअरटेल हे सर्वात वेगवान ब्रॉडबँड कनेक्शनपैकी एक आणि अत्यंत विश्वासार्ह आहे. एअरटेलच्या या प्लॅनची किंमत 799 रुपये आहे आणि यामध्ये 100 Mbps इंटरनेट स्पीड देण्यात आला येतो. वापरकर्त्यांना या प्लॅनसह 3.3TB किंवा 3300GB मासिक फेअर-यूज-पॉलिसी (FUP) डेटा मिळतो.
BSNL 100 Mbps Plans
BSNL वेगवेगळ्या फायद्यांसह 100 Mbps च्या इंटरनेट स्पीडसह दोन प्लॅन्स ऑफर करते. यातील पहिला प्लॅन म्हणजे सुपरस्टार प्रीमियम-1 आणि फायबर व्हॅल्यू प्लॅन. सुपरस्टार प्रीमियम-1 आणि फायबर व्हॅल्यू प्लॅन अनुक्रमे 749 रुपये आणि 799 रुपये प्रति महिना दराने 100 Mbps इंटरनेट स्पीड ऑफर करतात. सुपरस्टार प्रीमियम-1 प्लॅनमध्ये FUP डेटा मर्यादा 1000GB आहे, तर फायबर व्हॅल्यू प्लॅनमध्ये ती 3300GB आहे. सुपरस्टार प्रीमियम-1 प्लॅनमध्ये FUP डेटा मर्यादा 1000GB आहे तर फायबर व्हॅल्यू प्लॅनमध्ये ती 3300GB आहे. या सर्व प्लॅन्सच्या किंमतीत जीएसटी समाविष्ट नाही आणि ग्राहकांना वार्षिक 100 Mbps पॅक 9,588 रुपयांमध्ये मिळू शकतात. सुपरस्टार प्रीमियम 1 प्लॅन विशिष्ट OTT प्लॅटफॉर्मच्या सबस्क्रिप्शनसह येतो.