Lokmat Money > बिझनेस न्यूज > Jio-Airtel-Vi : दूरसंचार कंपन्या ग्राहकांना पुन्हा झटका देणार?, १२ टक्क्यांपर्यंत प्रीपेड प्लॅन्सच्या किंमती वाढण्याची शक्यता

Jio-Airtel-Vi : दूरसंचार कंपन्या ग्राहकांना पुन्हा झटका देणार?, १२ टक्क्यांपर्यंत प्रीपेड प्लॅन्सच्या किंमती वाढण्याची शक्यता

Jio-Airtel-Vi - काही दिवसांपूर्वीच कंपन्यांनी आपल्या प्रीपेड सेवांचे दर वाढवले होते. आता ताज्या रिपोर्टनुसार कंपन्या पुन्हा एकदा दिवाळीच्या सुमारास प्रीपेड सेवांचे दर १२ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 03:52 PM2022-05-24T15:52:35+5:302022-05-24T15:54:49+5:30

Jio-Airtel-Vi - काही दिवसांपूर्वीच कंपन्यांनी आपल्या प्रीपेड सेवांचे दर वाढवले होते. आता ताज्या रिपोर्टनुसार कंपन्या पुन्हा एकदा दिवाळीच्या सुमारास प्रीपेड सेवांचे दर १२ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे.

reliance jio airtel and vodafone idea may increase prepaid tariffs up to 12 per cent prepaid recharge plans | Jio-Airtel-Vi : दूरसंचार कंपन्या ग्राहकांना पुन्हा झटका देणार?, १२ टक्क्यांपर्यंत प्रीपेड प्लॅन्सच्या किंमती वाढण्याची शक्यता

Jio-Airtel-Vi : दूरसंचार कंपन्या ग्राहकांना पुन्हा झटका देणार?, १२ टक्क्यांपर्यंत प्रीपेड प्लॅन्सच्या किंमती वाढण्याची शक्यता

रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया आणि एअरटेलसारख्या खासगी दूरसंचार कंपन्या आपल्या ग्राहकांना पुन्हा एकदा झटका देण्याच्या तयारीत आहे. समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार या कंपन्या दिवाळीच्या सुमारास आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या किंमतीत वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कंपन्या रिचार्ज प्लॅन्स १० ते १२ वाढ करू शकतात. यापूर्वी कंपन्यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये कंपन्यांनी आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या किंमतीत वाढ केली होती.

अमेरिकन इक्विटी रिसर्च फर्म, विल्यम ओ'नील अँड कंपनीच्या भारतीय युनिटमधील इक्विटी रिसर्चचे प्रमुख मयुरेश जोशी यांच्या हवाल्यानं ईटी टेलिकॉमनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. टेलिकॉम कंपन्या पुन्हा एकदा १० ते १२ टक्क्यांनी आपल्या प्रीपेड प्लॅन्सचे दर वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे Airtel, Jio आणि Vodafone Idea चे ARPU (एव्हरेज रेव्हेन्यू पर युझर) अनुक्रमे २०० रुपये, १८५ रुपये आणि १३५ रुपये होईल.

नोव्हेंबर २०२१ मध्ये एअरटेल आणि व्होडाफोन आयडियानं आपल्या प्रीपेड प्लॅनच्या किंमतीत २० ते २५ टक्क्यांची वाढ केली होती. यानंतर रिलायन्स जिओनेही किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे ७९ रुपयांच्या प्लॅनची किंमत वाढून ९९ रुपयांपर्यंत पोहोचली. तर ८४ दिवसांच्या वैधतेच्या एअरटेलच्या प्लॅनची किंमत ६९८ रुपयांवरून वाढून ८३९ रुपये झाली होती.

एअरटेलच्या सीईओंचे संकेत  
एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विट्टल यांनी प्रीपेड प्लॅन्सच्या किंमतीत वाढ होण्याचे संकेत दिले होते. कंपनी प्रति युझर रेव्हेन्यू वाढवू इच्छित आहे आणि त्यासाठी कंपनी २०२२ मध्ये पुन्हा एकदा किंमती वाढवू शकते असंही त्यांनी म्हटलं होतं.

Web Title: reliance jio airtel and vodafone idea may increase prepaid tariffs up to 12 per cent prepaid recharge plans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.