सध्या सर्वच टेलिकॉम कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा सुरू आहे. अशातच अनेकांना अधिक डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग आवश्यक असतं. दरम्यान, आज आपण रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाच्या त्या प्लॅन्सबद्दल जाणून घेऊ ज्याची किंमत तर कमी आहेच, पण मिळणारे बेनिफिट्सही अधिक आहेत. याव्यतिरिक्त या रिचार्ज प्लॅनमध्ये कॉलिंगसह अन्य बेनिफिट्सही मिळतील. तर पाहूया कोणते आहेत हे प्लॅन्स.
व्होडाफोन आयडियाकडे एक उत्तम प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत ४४९ रूपये इतकी आहे. या प्लॅनसोबत कंपनी दिवसाला ४ जीबी डेटा देते. तसंच या प्लॅनसोबत मिळणारा डेटा अन्य कंपन्यांच्या तुलनेत अधिक आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी ५६ दिवसांची आहे. यामध्ये एकूण २२४ जीबी डेटा मिळतो. या प्लॅनचा एका दिवसाचा खर्च ८ रूपये इतका पजतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० एसएमएसची सुविधाही देण्यात येते. तसंच बिंज ऑल नाईट आणि डबल डेटाचादेखील फायदा घेता येतो. यामध्ये ग्राहकांना रात्री १२ ते सकाळी ६ या वेळेत अनलिमिटेड डेटा वापरण्याची मुभा मिळते. याव्यतिरिक्त विकेंड रोलओव्हरचीही सुविधा देण्यात येते.
एका दिवसाचा खर्च १० रूपये
एअरटेलच्या या प्लॅनमध्ये एका दिवसाला जास्तीतजास्त ३ जीबी डेटा देण्यात येतो. दिवसाला ३ जीबी डेटा देणारे एअरटेलकडे अनेक प्लॅन्स आहेत. यामध्ये ५५८ रूपयांचा प्लॅन हा सर्वात स्वस्त आहे. यामध्ये ५६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. तसंच यात एकूण १६८ जीबी डेटाही देण्यात येतो. या प्लॅनचा दिवसाचा खर्च ९.९६ रूपये म्हणजेच जवळपास १० रूपये इतका आहे. या प्लॅनसोबत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, १०० एसएमएस आणि एअरटेल एक्स्ट्रिम अशा अनेक सेवा दिल्या जातात.
जिओचा दिवसाला १२ रूपये खर्च
रिलायन्स जिओकडेही दिवसाला ३ जीबी डेटा देणारे काही प्लॅन्स आहेत. यामध्ये ९९९ रूपयांचा प्लॅन हा दिवसाच्या खर्चाच्या हिशोबानं स्वस्त आहे. ९९९ रूपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी ही ८४ दिवसांची आहे. यामध्ये एकूण २५२ जीबी डेटा देण्यात येतो. तसंच या प्लॅनचा एका दिवसाचा खर्च ११.८९ रूपये म्हणजेच १२ रूपयांपर्यंत आहे. या प्लॅनसोबत अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शन देण्यात येतं.