Lokmat Money > बिझनेस न्यूज > Jio नं आणली २ इन १ ऑफर, एका स्वस्त कनेक्शनवर चालणार दोन टीव्ही; ८००+ चॅनेल्स आणि १३ OTT मिळणार

Jio नं आणली २ इन १ ऑफर, एका स्वस्त कनेक्शनवर चालणार दोन टीव्ही; ८००+ चॅनेल्स आणि १३ OTT मिळणार

रिलायन्स जिओच्यावतीने मंगळवारी मोठा धमाका करण्यात आला. कारण कंपनीने पुन्हा एकदा फ्री ऑफर आणली आहे. पाहा काय आहे ही ऑफर.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 11:31 AM2024-08-22T11:31:19+5:302024-08-22T11:31:36+5:30

रिलायन्स जिओच्यावतीने मंगळवारी मोठा धमाका करण्यात आला. कारण कंपनीने पुन्हा एकदा फ्री ऑफर आणली आहे. पाहा काय आहे ही ऑफर.

reliance Jio brings 2 in 1 offer two TVs running on one cheap connection 800 plus channels and 13 OTT will be available | Jio नं आणली २ इन १ ऑफर, एका स्वस्त कनेक्शनवर चालणार दोन टीव्ही; ८००+ चॅनेल्स आणि १३ OTT मिळणार

Jio नं आणली २ इन १ ऑफर, एका स्वस्त कनेक्शनवर चालणार दोन टीव्ही; ८००+ चॅनेल्स आणि १३ OTT मिळणार

रिलायन्स जिओच्या (Reliance Jio) वतीने मंगळवारी मोठा धमाका करण्यात आला. कारण कंपनीने पुन्हा एकदा फ्री ऑफर आणली आहे. आता युजर्सला याच्या मदतीनं टीव्ही चॅनल्सचा अ‍ॅक्सेस मिळू शकतो. त्याचबरोबर युजर्संना जिओ फायबर कनेक्शनही दिलं जात आहे. या अंतर्गत युजर्संना एका जिओ फायबर कनेक्शनवर दोन टीव्हीचा अ‍ॅक्सेस दिला जातोय. या ऑफरअंतर्गत युजर्संना ८०० पेक्षा जास्त डिजिटल टीव्ही चॅनेल्स आणि १०+ भाषांचा अनुभव घेता येणार आहे आणि २० हून अधिक जॉनरदेखील ऑफर केले जात आहेत.

विशेष म्हणजे युजर्सला एका लॉगिनवर १३ लोकप्रिय ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळू शकतो. जिओ टीव्ही+ अ‍ॅपच्या मदतीनं युजर्सना मनोरंजन आणि त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी मिळू शकतात. त्यासाठी त्यांना वेगळं काही करण्याचीही गरज नाही. साध्या लॉगिनच्या साहाय्यानं ते हे करू शकतात. सिंगल साइन इन केल्यावर युजर्संना जिओ टीव्ही+ कॅटलॉग पाहायला मिळतो. याशिवाय स्मार्ट टीव्ही रिमोटही देण्यात आला आहे.

स्मार्ट फिल्टर, स्मार्ट मॉडर्न गाईड, कंट्रोल प्लेबॅक स्पीड, कॅच-अप टीव्ही, पर्सनलाइज्ड रिमांड आणि किड्स सेफ सेक्शन देखील उपलब्ध आहेत. युझर्स ओटीटी अ‍ॅप्सच्या मदतीने चॅनेल अ‍ॅक्सेस करू शकतात. सामान्य मनोरंजन, बातम्या, क्रीडा, संगीत, किड्स, व्यवसाय आणि भक्ती चॅनेल्ससह ८००+ डिजिटल टीव्ही चॅनेल्स अ‍ॅक्सेस केली जाऊ शकतात.

१३ ओटीटी अ‍ॅप्सही मिळणार

याशिवाय युजर्संना १३ ओटीटी अ‍ॅप्स देखील मिळणार आहेत. जिओ टीव्ही+ चा अ‍ॅक्सेस मिळवण्यासाठी तुम्हाला अ‍ॅप स्टोअरमध्ये जावे लागेल. यानंतर तुम्हाला अ‍ॅप्स इन्स्टॉल करावी लागतील आणि तिकडेच तुम्हाला ऑफर्सही दिसतील. जिओ टीव्ही+ अ‍ॅप, हॉटस्टार, झी ५, सोनी लिव्ह आणि सनएनएक्सटी अ‍ॅप्लिकेशन्स देखील उपलब्ध आहेत. लॉग इन करण्यासाठी मोबाइल नंबरचा वापर करावा लागेल. ओटीपीच्या मदतीने लॉग इन केल्यानंतर युजर्स कोणतेही अ‍ॅप वापरू शकतील. या ठिकाणी युजर्स इतर अ‍ॅप्सचाही आनंद घेऊ शकतात.

Web Title: reliance Jio brings 2 in 1 offer two TVs running on one cheap connection 800 plus channels and 13 OTT will be available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.