रिलायन्सजिओने यूजर्सना मोठा झटका दिला आहे. कंपनीने 15 डिसेंबरला आपला सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन लॉन्च केला होता. 1 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 30 दिवसांची वैधता आणि 100MB डेटा ऑफर करण्यात येत होता. तथापि, प्लॅन लॉन्च झाल्यानंतर एका दिवसातच, जिओने त्यात एक मोठा बदल केला आहे, यामुळे युजर्स नाराज होण्याचीही शक्यता आहे. कंपनीने आपल्या या एक रुपयांच्या प्लॅनमध्ये मोठी कपात केली आहे. Telecom Talk च्या रिपोर्टनुसार, Jio चा हा प्लान आता केळव 1 दिवसाची वैधता आणि 10MB डेटा देत आहे.
जिओच्या मोबाइल अॅपमध्ये लिस्ट आहे प्लॅन -
जिओचा हा प्लॅन My Jio मोबाइल अॅपमध्ये दिलेल्या 4G डेटा व्हाउचर सेक्शनमध्ये दिलेल्या मूल्य श्रेणीमध्ये सूचीबद्ध आहे. आपण खाली दिलेल्या मूल्य श्रेणीतील 'Other Plans' वर जाऊन हे पाहू शकता. अॅपमध्ये या प्लॅनला 'ट्रेनिंग प्लॅन' म्हणून संबोधण्यात आले आहे. काल हा प्लॅन युजर्सना 30 दिवसांची वैधता आणि 100MB डेटा ऑफर करत होता, पण आता या प्लॅनवर केवळ 1 दिवसाची वैधता आणि 10MB डेटाच मिळणार आहे.
15 रुपयांचे डेटा व्हाउचर ठरू शकते चांगला ऑप्शन -
Jio युजर्सना 15 रुपयांचे 4G डेटा व्हाउचर ऑफर करते. या डेटा व्हाउचरमध्ये, कंपनी इंटरनेट वापरासाठी 1GB हाय-स्पीड डेटा ऑफर करते. अशा स्थितीत, आपल्याला जर स्वस्त डेटा प्लॅनची आवश्यकता असेल, तर 15 रुपयांचा पॅक तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल. कारण 1 रुपयांच्या प्लॅनमध्ये 10 वेळा रिचार्ज केल्यानंतरही तुम्हाला फक्त केवळ 100MB डेटाच मिळेल.
एअरटेल आणि व्होडाकडे एवढा स्वस्त डेटा पॅक नाही -
जिओ आपल्या वापरकर्त्यांना सर्वात स्वस्त डेटा पॅक ऑफर करत आहे. एअरटेलबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीच्या वेबसाइटनुसार, एअरटेल आपल्या वापरकर्त्यांना 58 रुपयांचा सर्वात स्वस्त डेटा पॅक देत आहे. या पॅकमध्ये, कंपनी 3 GB डेटा ऑफर करते आणि त्याची वैधता चालू असलेल्या प्लॅनसारखीच राहते. जर Vodafone-Idea बद्दल बोलायचे झाल्यास, ते 19 रुपयांचे डेटा व्हाउचर देते. यात 24 तासांच्या वैधतेसह 1 GB डेटा ऑफर केला जातो.