Join us  

Jio ग्राहकांसाठी शानदार प्लॅन! कमी किमतीत दररोज 1GB डेटा, मोफत कॉलिंग आणि बरेच काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 1:55 PM

Reliance Jio Cheapest Plan : जर तुम्ही कमी किमतीचा मासिक प्लॅन शोधत असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो.

नवी दिल्ली : Reliance Jio कमी किंमतीत जास्त बेनिफिट्स देण्यासाठी ओळखले जाते. Reliance Jio जवळ असे अनेक स्वस्त प्लॅन आहेत (Reliance Jio Recharge Plans), ज्यामध्ये अधिक डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला जिओच्या 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लॅनबद्दल (Jio Plan Under Rs 200) सांगणार आहोत, ज्यामध्ये 1  जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि अनेक सुविधा दररोज उपलब्ध आहेत. जर तुम्ही कमी किमतीचा मासिक प्लॅन शोधत असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो.

Reliance Jio चा 186 रुपयांचा प्लॅनReliance Jio फोनच्या 186 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजरला 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. तसेच, या प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी डेटा मिळतो. म्हणजेच प्लॅनमध्ये एकूण 28 जीबी डेटा देण्यात आला आहे. दिवसाचा डेटा संपल्यानंतर, इंटरनेटचा स्पीड कमी होऊन @ 64 Kbps होतो. म्हणजेच रोजचा डेटा संपल्यानंतरही इंटरनेट उपलब्ध होईल.

फ्री कॉलिंग आणि दररोज 100 SMSडेटा व्यतिरिक्त, युजर्सला 186 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील मिळते. युजर्स कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉल करू शकतात. यासह, युजर्सला दररोज 100 एसएमएस (SMS) मिळतात. याशिवाय प्लॅनमध्ये जिओ मूव्ही, जिओ सिक्युरिटी, जिओ क्लाउडचे फ्री सब्सक्रिप्शन दिले आहे.

टॅग्स :जिओरिलायन्स जिओमोबाइल