सध्या सर्वच कंपन्या आपल्याकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि आपल्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी नवनव्या ऑफर्स आणत आहेत. परंतु रिलायन्स जिओनं आणलेली ही ऑफर तुम्हालाही नक्कीच आवडेल. कंपनी ९१ रुपयांचाही रिचार्ज प्लॅन देत असून यामध्ये कॉलिंगपासून, डेटा पर्यंत सर्वच सुविधा उपलब्ध आहेत. यात ग्राहकांना दररोज डेटा दिला जातो. याशिवाय यात अनलिमिडेट कॉलिंग आणि एसएमएसचीही सुविधा देण्यात येते. जिओच्या तुलनेत एअरटेलकडे ९९ रूपये आणि व्होडाफोन आयडियाकडे ९८ रुपयांचे प्लॅन्स आहेत.
९१ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहतांना दररोज १०० एमबी डेटा देण्यात येतो. याशिवाय या प्लॅनसह अतिरिक्त २०० एमबी डेटा देण्यात येतोय. या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. यादरम्यान, कंपनी ग्राहकांना एकूण ३ जीबी डेटा ऑफर करत आहे. तसंच यात अनलिमिटेड कॉलिंगचीही सुविधा दिली जातेय. याशिवाय ग्राहकांना जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शनही दिलं जातं. परंतु सध्या हा प्लॅन केवळ जिओ फोन युझर्ससाठी आहे.
व्होडाफोनच्या अशा प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. यात २०० एमबी डेटा देण्यात येतो. यात कोणतंही एसएमएस बेनिफिट देण्यात येत नाही. एअरटेल ९९ रूपयांचा प्लॅन ऑफर करत असून त्याची वैधता२८ दिवसांची आहे. यात ग्राहकांना ९९ रूपयांचा टॉकटाईम दिला जातो. यादरम्यान, २.५ पैसे प्रति सेकंद दराने शुल्क आकारले जाते. याशिवाय तुमच्याकडून एसएनएससाठीही शुल्क आकारले जाईल.