Jio Diwali Dhamaka Offer: काही वर्षांपूर्वी रिलायन्स जिओने फ्री 4G लाँच करत मोबाईल नेटवर्क क्षेत्रात धुमाकूळ घातला होता. जिओपूर्वी भारतात डझनभर नेटवर्क कंपन्या अस्तित्वात होत्या. मात्र, जिओपुढे सर्वांनी आपला गाशा गुंडाळला. यात अनेक परदेशी कंपन्यांनी आपलं दुकान कायमचं बंद केलं तर काही कंपन्या इतर कंपन्यांमध्ये सहभागी झाल्या. जिओच्या आगमनानंतर आता हातावर मोजण्याइतक्यात कंपन्या बाजारात शिल्लक आहे. आता असाच धमाका वायफाय क्षेत्रात करण्याची योजना रिलायन्स जिओची असल्याचे दिसत आहे. कारण, जिओ आपल्या यूजर्ससाठी दिवाळी भेट घेऊन आले आहे.
वास्तविक रिलायन्स जिओने आपल्या यूजर्ससाठी 'दिवाळी धमाका' ऑफर आणली आहे. रिलायन्सच्या या दिवाळी धमाका ऑफर अंतर्गत वापरकर्ते आता वर्षभर मोफत JioAirFiber सेवांचा आनंद घेऊ शकतात. ही ऑफर 18 सप्टेंबर ते 3 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.
जिओच्या फ्री JioAirFiber ऑफरचा लाभ कसा मिळणार?या ऑफरचा लाभ घेण्यासाठी, नवीन ग्राहकांना कोणत्याही रिलायन्स डिजिटल किंवा MyJio स्टोअरमध्ये २०,००० रुपये किंवा अधिक रुपयांची खरेदी करावी लागेल. किंवा ग्राहक २,२२२ रुपयांच्या ३ महिन्यांच्या दिवाळी प्लॅनसह नवीन JioAirFiber कनेक्शन निवडू शकतात. विद्यमान JioFiber आणि JioAirFiber वापरकर्ते देखील त्याच ३ महिन्यांच्या दिवाळी प्लॅनसह एक-वेळ ॲडव्हान्स रिचार्ज करून लाभ घेऊ शकतात.
पात्र ग्राहकांना १ वर्षात १२ कूपन मिळतील, प्रत्येक कूपन वापरकर्त्याच्या अॅक्टीव JioAirFiber प्लॅनच्या किमतीशी जुळणारे असेल. हे कूपन ३० दिवसांच्या आत रिलायन्स डिजिटल, MyJio, JioPoint किंवा JioMart Digital विशेष स्टोअरमध्ये १५,००० रुपये किंवा त्याहून अधिक किमतीचे इलेक्ट्रॉनिक्स खरेदी करण्यासाठी वापरले जाऊ शकते.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 47 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) चेअरमन मुकेश अंबानी यांनी या दिवाळीपासून Jio वापरकर्त्यांना 100GB पर्यंत मोफत क्लाउड स्टोरेज देण्याची योजना जाहीर केली होती. या ऑफर अंतर्गत, वापरकर्त्यांना त्यांचे सर्व फोटो, व्हिडिओ, डाक्युमेंट आणि इतर डिजिटल साहित्य सुरक्षितपणे संग्रहित करण्यासाठी आणि ॲक्सेस करण्यासाठी 100 GB पर्यंत स्टोरेज मिळते.