मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने (Reliance Jio) एअरटेल(Airtel), व्होडाफोन आयडियाप्रमाणे (Vodafone Idea) प्रीपेड प्लान्समध्ये मोठी वाढ केली आहे. या आधी या दोन्ही कंपन्यांनी प्लॅन्समध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता जिओ ग्राहकांनाही मोठा झटका बसला आहे. दरम्यान, रिलायन्स जिओनं तब्बल २० टक्क्यांची म्हणजे ४८० रूपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. नवे दर हे १ डिसेंबर २०२१ पासून लागू होणार आहेत.
१ डिसेंबर पर्यंत सध्याच्याच किंमतीत ग्राहकांना प्लॅन्स रिचार्ज करता येणार आहेत. दरम्यान, या कालावधीत रिलायन्स जिओचा कोणताही वार्षिक प्लॅन रिचार्ज करणं फायद्याचं ठरू शकतं. तसंच सध्याचा तुमचा प्लॅन संपल्यानंतरच नव्यानं रिचार्ज केलेला तुमचा प्लॅन सुरू होणार आहे. आता रिचार्ज केल्यास तुम्हाला अधिक किंमत द्यावी लागणार नाही.
वार्षिक प्लॅनच्या किंमतीतही वाढ
रिलायन्स जिओकडे ३६५ दिवसांच्या वैधतेसह येणारे ठराविक प्लॅन्स आहेत. यापैकी एक प्लॅन म्हणजे २३९९ रूपयांचा प्लॅन. १ डिसेंबरनंतर ग्राहकांना या प्लॅनसाठी २८७९ रूपये खर्च करावे लागतील. दरम्यान, हा प्लॅन ४८० रूपयांनी महाग होणार आहे. या प्लॅनसोबत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि अन्य बेनिफिट्सही दिले जातात.
या प्लॅनमध्ये ३६५ दिवसांची वैधता जेण्यात येते. याशिवाय या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा देण्यात येतो. या प्रकारे यामध्ये एकूण ७३० जीबी डेटा देण्यात येतो. प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएसची सुविधा देण्यात येते. याशिवाय या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चं मोफत सबस्क्रिप्शन देण्यात येतं.
किती वाढ?
जियोने प्लॅन्सच्या किंमतीत १६ रुपयांपासून ४८० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. जिओफोनसाठी असलेल्या विशेष प्लॅन ७५ रुपयांऐवजी आता ९१ रुपये मोजावे लागणार आहेत. अनलिमिटेड प्लॅन्स १२० रुपयांऐवजी आता १५५ रुपयांना मिळणार आहे. डाटा अॅड ऑन्स प्लॅनचे दर देखील वाढविण्यात आले आहेत. ६ जीबीच्या प्लॅनसाठी ५१ रुपयांऐवजी आता ६१ रुपये मोजावे लागणार आहेत. तर १०१ रुपयांच्या १२ जीबी प्लॅनसाठी १२१ रुपये मोजावे लागणार आहेत. ५० जीबीचा प्लॅनदेखील ५० रुपयांनी महागला आहे.