यंदाचा स्वातंत्र्यदिन खूप खास आहे. आपला देश इंग्रजांच्या जोखडातून स्वतंत्र होऊन ७५ वर्षे होत आहेत. सरकारकडून घराघरात तिरंगा अभियान राबविले जात आहे. रिलायन्स जिओने याच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनी देशात ५जी सेवा सुरु करण्याची योजना बनविलेली आहे. त्यापूर्वी Reliance Jio ने वर्षभराची ऑफर आणली आहे.
रिलायन्स जिओनेस्वातंत्र्य दिनानिमित्त ऑफर जारी केली आहे. याद्वारे कंपनी 2,999 रुपयांच्या वर्षभराच्या रिचार्जवर 3,000 रुपयांचा लाभ देऊ केला आहे. म्हणजेच हा लाभ घेतलात तर पूर्ण वर्षभराचा प्लॅन तुम्हाला फ्री होणार आहे. कंपनीने अधिकृत ट्विटद्वारे याची माहिती दिली आहे.
या प्लॅनमध्ये यूजर्सना 3,000 रुपयांचे फायदे मिळतील. यूजर्सना प्रतिदिन २.५ जीबी डेटा दिला जात आहे. यासोबतच या प्लानची वैधता 365 दिवसांची आहे. संपूर्ण वर्षा दरम्यान, वापरकर्त्यांना 912.5 GB डेटा दिला जाईल. अमर्यादित कॉलिंग सुविधेसह दररोज १०० एसएमएसही दिले जातील. याचबरोबर डिस्ने + हॉटस्टार मोबाईलचे सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी दिले जाणार आहे.
यामध्ये यूजर्सना 750 रुपयांचे AJIO चे कूपन दिले जाईल. Netmeds वर 750 रुपये आणि ixigo वर 750 रुपये सूट देखील दिली जाईल. याशिवाय 750 रुपयांचा 75GB डेटाही दिला जाईल. अशा प्रकारे Jio वापरकर्त्यांना 2,999 रुपयांच्या रिचार्जमध्ये 3,000 रुपयांचे फायदे देणार आहे.