रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी भेट आणली आहे. कंपनीने एक 'JioTogether' हा रेफरल कोड लॉन्च केला आहे. याचा वापर नवीन Jio प्रीपेड कनेक्शनवर आणि Jio च्या सेवेवर पोर्ट केल्यानंतर वापरता येईल. जिओच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार या ऑफर अंतर्गत, रेफर आणि रेफरर दोघांनाही 98 आणि 349 रुपयांचे मोफत रिचार्ज व्हाउचर दिले जातील. जिओ विविध ब्रँड्सचे 2,000 रुपयांपर्यंतचे अतिरिक्त डिस्काउंट व्हाउचर देखील ऑफर करत आहे.
जास्तीत जास्त रेफरल मिळवण्यासाठी कंपनी ग्राहकांना प्रत्येक वेळी अधिक किंमतीचं व्हाऊचर देणार आहे. पहिल्या रेफरलवर कंपनी तुम्हाला 98 रुपयांचे मोफत रिचार्ज देईल, यामध्ये दररोज 1.5GB डेटा आणि 14 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग ऑफर करण्यात येत आहे.. त्याचप्रमाणे तुमच्या 12 व्या रेफरलवर कंपनी 349 रुपयांचे सहा व्हाउचर देणार आहे. प्रत्येक व्हाउचरमध्ये तुम्हाला दररोज 3GB डेटा आणि 28 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगची सेवा मिळणार आहे.
कसा मिळेल लाभ?
ही ऑफर 12 ऑक्टोबर 2021 पासून लाईव्ह आहे. जिओची ही ऑफर टप्प्याटप्प्याने आणली जात आहे. रिलायन्स जिओकडून पात्र ग्राहकांना एक व्हिडीओ पाठवला जात आहे. तुम्ही हा व्हिडीओ कोणत्याही व्यक्तीला पाठवू शकता. ज्यांना जिओचं नवं कनेक्शन घ्यायचं आहे किंवा पोर्ट करायचं आहे त्यांना हा व्हिडीओ पाठवता येऊ शकतो.
व्हाउचर मिळवण्यासाठी युझर्सना आरला पहिला रिचार्ज 199 किंवा 249 रूपयांचं करावं लागेल. त्यानंतर त्यांना रेफरल कोड शेअर करावा लागेल. सिम कार्ड अॅक्टिव्हेट झाल्यानंतर ग्राहकांना FRIEND असं टाईप करून 7977479774 या क्रमांकावर Whatsapp करावं लागेल. त्यानंतर 3 दिवसांच्या आत रेफररचा मोबाईल क्रमांक शेअर करावा लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर फोनमध्ये व्हाउचर्स दिसतील. ही व्हाउचर्स MyJIO अॅपद्वारेही क्लेम करू शकता.