Join us  

Reliance Jio नं लाँच केले २ नवे रिचार्ज प्लॅन्स; केवळ १ रुपयाचा फरक, कोणता आहे बेस्ट? 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 12:30 PM

Reliance Jio Recharge Plans : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओनं आपल्या सर्व युजर्ससाठी वेगवेगळ्या प्रकारचे रिचार्ज प्लॅन आणले आहेत. पाहूया या नव्या प्लॅन्समध्ये काय आहे खास?

Reliance Jio Recharge Plans : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स जिओनं (Reliance Jio) आपल्या सर्व युजर्ससाठी वेगवेगळ्या प्रकारचे रिचार्ज प्लॅन आणले आहेत. जिओमध्ये ग्राहकांना महागडे आणि स्वस्त रिचार्ज प्लॅनही मिळणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून जिओनं आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या होत्या, तेव्हापासून जिओ आपल्या युजर्सना चांगल्या सुविधा देण्यासाठी नवीन रिचार्ज प्लॅन देत आहे. अशातच जिओनं नुकतेच दोन नवे रिचार्ज प्लॅन सादर केलेत.

जिओच्या दोन नव्या रिचार्ज प्लॅनमध्ये फक्त १ रुपयाचा फरक आहे. जिओचा एक प्लॅन तुम्ही १०२८ रुपयांमध्ये खरेदी करू शकता आणि दुसरा प्लॅन १०२९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया १ रुपयाच्या फरकात तुम्हाला काय काय मिळणारे आणि या दोन्ही प्लॅन्सपैकी कोणता प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट असेल.

जिओचा १०२८ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओच्या १०२८ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला ८४ दिवसांची वैधता मिळणार आहे. या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. डेटाबद्दल बोलायचं झालं तर प्लानमध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा दिला जाईल. या प्लानमध्ये तुम्ही ५जी नेटवर्क असताना अनलिमिटेड ५जी सेवेचा आनंद घेऊ शकता. या सर्व बेनिफिट्ससोबतच प्लॅनमध्ये स्विगी युजर्ससाठी वन लाइट मेंबरशिपही देण्यात आली आहे. तसंच या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओक्लाऊड सेवेचा ही लाभ घेऊ शकता.

जिओचा १०२९ रुपयांचा रिचार्ज प्लान

जिओच्या १०२९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला ८४ दिवसांची वैधता मिळणार आहे. या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. डेटाबद्दल बोलायचं झालं तर प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा दिला जाईल. या प्लॅनमध्ये तुम्ही ५जी नेटवर्क असताना अनलिमिटेड ५जी सेवेचा आनंद घेऊ शकता. या सर्व बेनिफिट्ससोबत तुम्हाला प्लॅनमध्ये क्लाऊड फ्री सर्व्हिस मिळते. युजर्सला अॅमेझॉन प्राईम लाइट मेंबरशिप मिळते. या प्लॅनमध्ये तुम्ही जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊड सेवेचाही लाभ घेऊ शकता.

टॅग्स :रिलायन्स जिओमुकेश अंबानी